Actress Deepika Padukone's manager Karishma Prakash is absent for NCB's inquiry | अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश चौकशीला गैरहजर

अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश चौकशीला गैरहजर

ठळक मुद्देती वैयक्तिक कारणास्तव  मुंबईत नसल्याने चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळविले. तिच्याकडे नंतर चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले.

मुंबई - बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोनची मॅनेजर  करिश्मा प्रकाश हिने अंमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) कार्यालयात चौकशीला गैरहजर राहिली. वैयक्तिक कारणास्तव सध्या येवू शकत नसल्याचे तिने  कळविले असल्याचे समजते. त्यामुळे तिला पुन्हा समन्स बजाविण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
 

मंगळवारी एनसीबीने तिच्या वर्सोवा येथील घरी छापा टाकला होता, त्यावेळी १.८ ग्रॅम चरस व सीबीडी ऑईल मिळाले होते. ती घरी नसल्याने तिला बुधवारी कार्यालयात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र ती वैयक्तिक कारणास्तव  मुंबईत नसल्याने चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळविले. तिच्याकडे नंतर चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले.
   

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

अभिनेता सुशांतसिह राजपूत याच्या आत्महत्याच्या तपासातून  बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन चव्हाट्यावर आले. याप्रकरणी गेल्या महिन्यात दीपिका, करिष्मासह  सारा खान, श्रद्धा कपूर , नुकूलप्रीती सिंग आदींची सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर ठोस पुरावे न  मिळाल्याने एनसीबीने ड्रग्ज तस्कराना पकडण्यावर भर दिला होता. मात्र एका तस्कराकडे केलेल्या तपासात दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिच्याबद्दल  माहिती मिळाली.त्यामुळे पथकाने आज तिच्या घरी छापा टाकला होता.

Web Title: Actress Deepika Padukone's manager Karishma Prakash is absent for NCB's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.