NCB raids Deepika Padukone's manager's house; Large quantities of drugs were found | दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर असलेली करिश्मा प्रकाशच्या घरी एनसीबीचा छापा टाकला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले आहे. महत्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. 


लॉकडाऊनमध्ये दीपिका सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती पण ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर ती ना इन्स्टाग्रामवर ना ट्विटरवर कुठेच सक्रिय दिसली नाही. एनसीबीच्या चौकशीनंतर ती एकही पोस्ट सोशल मीडियावर केली नव्हती. आता मॅनेजरच्याच घरी मोठा साठा सापडल्याने दीपिका पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 


करिश्मा प्रकाश छाप्यानंतर गायब झाली असून तिला हजर राहण्याची नोटीस एनसीबीने बजावली आहे. तिच्या मुंबईतील घराच्या दारावर ही नोटीस चिकटविण्यात आली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्जच्या सेवनावर करिश्माचाही गेल्या महिन्यात एनसीबीने चौकशी केली होती. तिच्यासोबत दीपिका पदुकोण, रकुल प्रित सिंग, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही चौकशीला बोलविण्यात आले होते. दीपिका, श्रद्धाचे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव आले होते. 


करिश्मा प्रकाशला एनसीबीने उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. 


दरम्य़ान, करिश्माच्या घरी एनसीबीने आज छापा मारल्याची चर्चा आहे. तिच्या घरातून अज्ञात प्रमाणावर ड्रग्ज सापडले आहे. करिश्मा फरार असून तिची चौकशी केली जाणार आहे. 


दीपिकाचा सिनेमा येणार
प्रभास आणि दीपिकाची जोडी एक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण स्वतः दीपिकाने काही महिन्यांपूर्वीच चित्रपटाची घोषणा केली होती.ती म्हणाली होती की, साऊथ सुपरस्टारबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करते आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. 

Web Title: NCB raids Deepika Padukone's manager's house; Large quantities of drugs were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.