एखाद्या व्यापाऱ्याची आधी रेकी करुन नंतर त्याला महिलेमार्फत फोन केल्यानंतर दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात पाचशेच्या नोटा मागून कोणत्याच नोटा न देता गंडा घालण्याचे प्रकार ठाण्यात वाढले आहेत. ...
तस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडले. तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले. ...
मालवणात पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या. तारकर्ली व किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या या मारहाणीबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद करण्याची कार्यवाही पोलीस ठाण्यात सुरू होती. ...
जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...
शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास जादा परतावा मिळवून देईन, असे आमिष दाखविले़. त्याच्या या आमिषाला भुलून कंपनीतील १५ जणांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास दिले़. ...
गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ...