अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:28 IST2026-05-18T14:22:47+5:302026-05-18T14:28:13+5:30

Adhik Maas Vinayaka Chaturthi Angarak Yog 2026: अधिक मासातील विनायक चतुर्थी अंगारक योग दिवशी अगदी पाच ते दहा मिनिटात होणारी गणपती उपासना केल्यास कालातीत शाश्वत कृपा लाभू शकते, असे म्हटले जाते.

vinayak chaturthi angarak yog adhik maas may 2026 chant effective ganesh mantra recite impactful ganpati stotra get timeless virtue | अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!

अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!

Adhik Maas Vinayaka Chaturthi Angarak Yog 2026: ज्येष्ठ अधिक मास सुरू झाला आहे. अधिक महिना सुरू होताच लगेचच मंगळवार, १९ मे २०२६ रोजी विनायक चतुर्थी अंगारक योग जुळून आलेला आहे. अधिक मासात जी व्रते, उपासना केल्या जातात, त्याचे फल अनेक पटींनी मिळते, असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी अंगारक योग व्रतात गणेशाच्या प्रभावी मंत्रांचे जप आणि स्तोत्र पठण केल्यास त्यांचा चांगला लाभ होऊ शकतो. समस्या, संकट दूर होऊ शकतात, शाश्वत कृपा लाभू शकते, असे म्हटले जाते. 

मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. यंदा २०२६ रोजी ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. 

अधिक मास विनायक चतुर्थी अंगारक योग प्रभावी मंत्र

गणपतीचे विशेष व्रत किंवा विशेष पूजन करणे शक्य नसेल, तर किमान १०८ वेळा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा आवर्जून जप करावा. ११ किंवा २१ माळाही जप करू शकतात. अगदीच शक्य नसेल, तर यथाशक्ती जप करावा.  गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. गणपतीला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. जास्वंदाचे फूल अर्पण करावे. मनापासून नमस्कार करावा.

गणेश पंचरत्नम् सोत्र 

मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकम् । 
कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् । 
अनायकैक नायकं विनाशितेभदैत्यकम् । 
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ।।१।।

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् । 
नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं । 
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ।।२।।

समस्तलोकशंकरं निरस्तदैत्यकुञ्जरम्। 
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम्।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् । 
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्।।३।।

अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्ति भाजनम् । 
पुरारिपूर्व नन्दनं सुरारि गर्वचर्वणम्।
प्रपंच नाशभीषणं धनंजयादि भूषणम्। 
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ।।४।।

नितान्तकान्तदन्तकान्ति - मन्तकान्तकात्मजम् । 
अचिन्त्य - रुपमन्तहीन - मन्तरायकृन्तनम्।
ह्रदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम्। 
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्।।५।।

फलश्रुति

महागणेश पंचरत्नम् आदरेण योन्वहम्। 
प्रजल्पति प्रभातके ह्रदि स्मरन् गणेश्वरम्।
अरोगितामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्। 
समाहितायु - रष्टभूतिमभ्युपैति सोSचिरात्।।

संस्कृत संकटनाशन गणेश स्तोत्र

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम ।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

॥ इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ॥

संकटनाशन गणेश स्तोत्र मराठी

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥

प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥

नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥

देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धि दे ॥ ५ ॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥

जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥

नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥

॥ संकटनाशनं श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title : अंगारक योग 2026: विनायक चतुर्थी, बाधा निवारण के लिए शक्तिशाली मंत्र।

Web Summary : 2026 में, अधिक मास में अंगारक योग के साथ विनायक चतुर्थी है। आशीर्वाद और समस्या निवारण के लिए शक्तिशाली गणेश मंत्रों और स्तोत्रों का पाठ करें। 'ओम गण गणपतये नम:' या गणेश पंचरत्नम का जाप बाधाओं को दूर करता है और समृद्धि लाता है।

Web Title : Angarak Yog 2026: Vinayaka Chaturthi, powerful mantras for obstacle removal.

Web Summary : In 2026, Adhik Maas brings Vinayaka Chaturthi with Angarak Yog. Recite potent Ganesh mantras and stotras for blessings and problem alleviation. Chanting 'Om Gan Ganapataye Namah' or Ganesh Pancharatnam removes obstacles and brings prosperity.