देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
इंधन दरवाढविरोधात सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापुरात रॅलीच्या प्रारंभीच काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. रॅली सुरू होतानाच गाडी पुढे घेण्यावरून आणि घोषणा देण्यावरून हा प्रकार पक्ष कार्यालयासमोरच घडला. ...
मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, पदाधिकारी यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, रिटा गुप्ता यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना देखील सेनाभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला. ...
ठाणे - पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमंतीच्या विरोधात सोमवारी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार ठाण्यातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने रस्त्यावर उतरुन वाहतुक व्यवस्था एक तास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु प ...