देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, भाकप, समाजवादी पार्टी आदी विविध विरोधी पक्षांच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात ...
पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदा ...
फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. ...
आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीयअध्यक्षा अॅड. नंदा पराते यांनी बुधवारी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुणे शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे ...