देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल 350 पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन निगोसिएशन टीमचा अहवाल पत्रकार ...
वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे. ...
एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताचे निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाला लगावला. ...
पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यावर केला. ...