आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 07:39 IST2026-05-02T07:38:19+5:302026-05-02T07:39:20+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
मेष - आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. आणखी वाचा
वृषभ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
कर्क - आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने सुद्धा मन दुःखी होईल. आणखी वाचा
सिंह - कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आणखी वाचा
तूळ - आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख - शांती नांदेल. आणखी वाचा
मकर - स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कुंभ - आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद - मौजमजा ह्यासाठी पैसा खर्च होईल. संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा
मीन - आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळे अडचणीत याल. आणखी वाचा
