IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा

यशस्वी पाठोपाठ वैभवही ठरला अपयशी

By सुशांत जाधव | Updated: May 2, 2026 08:32 IST2026-05-02T08:23:38+5:302026-05-02T08:32:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RR vs DC KL Rahul, Mitchell Starc Shine In Delhi Capitals' 7-Wicket Win Over Rajasthan Royals Vaibhav Suryavanshi Yashasvi Jaiswal Pair Flopped! But RR remained unfazed | IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा

IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात केएल राहुल आणि पथुम निसंका यांच्या हिट शोच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने IPL मधील आल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत ७ विकेट्सनी विक्रमी विजय नोंदवला. दुसऱ्या बाजूला वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल ही IPL मधील धडाकेबाज जोडी फ्लॉप ठरली. हे राजस्थान रॉयल्सच्या पराभवामागचं एक कारणच आहे. पण तरीही राजस्थान रॉयल्स निर्धास्त आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

यशस्वी पाठोपाठ वैभवही ठरला अपयशी

पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या सलामी जोडीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कनं पहिल्या षटकातच यशस्वी जैस्वाल याला ६ धावांवर तंबूता रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकात कायले जेमिसन याने वैभव सूर्यवंशीची खेळीला चार धावांवर ब्रेक लावलण्यात यश मिळवलं.

तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?

ध्रुव जुरेल-रियान पराग जोडी जमली

RR चा संघ अडचणीत सापडल्यावर ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान पराग जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत १०२ धावांची भागीदारी रचली. ध्रुव ३० चेंडूत ४२ धावा करून परतल्यावर रियान पराग नव्वदीच्या घरात पोहचल्यावर बाद झाला. त्याने ५० चेंडूत ९० धावांची खेळी केली.अखेरच्या षटकात डोनोव्हन फरेरा याने आणखी एक धमाकेदार खेळीचा नजराणा पेश करताना अवघ्या १४ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची नाबाद खेळी केली. तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद २२५ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २२६ धावांचे टार्गेट सेट केले होते. दिल्लीकडून मिचेल स्टार्कनं दुखापतीतून सावरुन जबरद्सत कमबॅक करताना घेतलेल्या  ३ विकेट्सशिवाय कायले जेमिसन, अक्षर पटेल आणि टी-नटराजन यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली. 

KL राहुलसह पथुम निसंकाची क्लास खेळी

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने IPL च्या इतिहासात एवढी मोठी धावसंख्या कधीच यशस्वीरित्या पार केली नव्हती. पण पथुम निसंकाने पुन्हा मिळालेल्या संधीच सोन करताना ३३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१२ धावांची दमदार खेळी साकरली. लोकेश राहुलनं पुन्हा आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवत ४० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७५ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. नितीश राणाने केलेल्या १७ चेंडूतील ३३ धावांच्या उपयुक्त खेळीनंतर ट्रिस्टन स्टब्स १८(११) आणि आशुथोष शर्मा २५ (१५) जोडीनं अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सचा विजय निश्चित केला. राजस्थानकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

DC ला मोठा दिलासा, पराभवानंतरही RR निर्धास्त

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने केएल राहुल, पथुम निसंका यांच्या दमदार फटकेबाजीसह स्टार्कच्या गोलंदाजीच्या जोरावर सलग तीन पराभवानंतर दमदार कमबॅक केले. या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत स्वबळावर टिकण्याची आस कायम ठेवल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे पराभवानंतरही राजस्थान रॉयल्सचा संघ निर्धास्त आहे. कारण १० सामन्यानंतर ६ विजयासह १२ गुणांची कमाई करून ते अजूनही आघाडीच्या चारमध्ये आहेत. प्लेऑफ्सच तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित ४ सामन्यात दोन विजय त्यांना पुरेसे आहेत. 
 

Web Title : IPL 2026: वैभव-यशस्वी फ्लॉप, फिर भी RR निर्धास्त; राहुल चमके।

Web Summary : दिल्ली ने 226 रनों का लक्ष्य हासिल किया, राहुल के 75 और निसंका के 62 रन। वैभव और यशस्वी के विफल रहने पर भी राजस्थान प्लेऑफ के लिए आश्वस्त है।

Web Title : IPL 2026: RR loses despite DC's win; Rahul shines.

Web Summary : Despite RR's Dhawan and Jaiswal's failure, DC chased down 226. Rahul's 75 and Nisanka's 62 led Delhi to a 7-wicket victory. RR remains confident for playoffs qualification.