कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:45 IST2026-05-02T06:45:18+5:302026-05-02T06:45:53+5:30

उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी लग्नाला हजेरी लावली व नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर म्हस्के यांनी राऊत यांचा सन्मान केला.

Shinde Sena officials who said they would not allow him to set foot in Thane, arrived to welcome Sanjay Raut | कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले

कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले

मुलाच्या लग्नानिमित्त म्हस्के-राऊत एकत्र

शिवसेनेतील फुटीनंतर खा. संजय राऊत आणि खा. नरेश म्हस्के एकमेकांवर धारदार टीकेचे बाण सोडत असताना गुरुवारी मात्र ते एकत्र दिसले. निमित्त होते शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याचे. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी लग्नाला हजेरी लावली व नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर म्हस्के यांनी राऊत यांचा सन्मान केला. ठाण्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या टेंभी नाक्यावर राऊत यांच्याविरोधात शिंदेसेनेने आंदोलन करत त्यांना ठाण्यात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, तेच पदाधिकारी राऊत यांच्या स्वागताला विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हजर होते.

‘एक नारी सब पे भारी’

बेलापूर येथील गणेश विसर्जन जेट्टी तसेच दशक्रिया विधी घाटावरून भाजपच्या दोन गटात वाद सुरू आहे. येथील दशक्रिया विधी घाटाचा मार्ग मरिना होणार असे सांगून एका गटाने बंद केला होता. मात्र, रस्ता बंद केल्याने खरी अडचण स्थानिक प्रकल्पग्रस्तांचीच झाली. दशक्रिया विधीस अडचणी येऊ लागल्या. परंतु, आक्रमक स्वभावाच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून बेलापूर सेक्टर-१५ येथील त्याच ब्रिजखाली आता गणेश विसर्जन जेट्टीसह दशक्रिया विधी घाट, पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला असून रविवारी त्याचे भूमिपूजन होत असल्याने स्थानिक रहिवासी ‘एक नारी सब पे भारी’ असे म्हणू लागले आहेत.

शिंदेसेनेचे वामन म्हात्रे दिल्लीत

बदलापुरातील शिंदेसेनेचा चेहरा असलेले माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे अचानक दिल्लीत गेले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आजपर्यंत राज्यातील मंत्र्यांची भेट घेताना म्हात्रे दिसले होते. मात्र अचानक म्हात्रे यांनी दिल्ली गाठल्यामुळे आता बदलापुरात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त आणि शहराच्या इतर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात असले तरी गडकरी आणि म्हात्रे यांची भेट नेमकी विकासाची की राजकीय होती यावर आता चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आ. किसन कथोरे यांना ओव्हरटेक करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चाही सुरू आहे.

आमदार मोरेंचा कॅरमचा डाव

राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात तरबेज असतात. कुणी बुद्धिबळाचे डावपेच खेळून, तर कुणी क्रिकेटच्या मैदानात चौकार, षटकार लावून खिलाडूवृत्ती दाखवून सगळ्यांना आपलेसे करतात. आमदार राजेश मोरे हे मतदारसंघात कुठेही कार्यक्रम असो ते आवर्जून जातात. आमदार मोरे सगळ्यांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोरे यांनी कॅरम खेळण्याची संधी सोडली नाही. खेळातही डावपेच आखून अधिकाधिक सोंगट्या स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी त्यांचे सतत लक्ष्य असते अशीच चर्चा कॅरम स्पर्धेत त्यांनी डाव लावल्यावर सुरू होती.

‘कॉक’वरून रंगले राजकारण

पनवेल - नवी मुंबईदरम्यान पाणीपुरवठ्याच्या मुद्द्याला राजकीय रंग चढू लागला आहे.  मोरबे धरणाची जीवनदायी जलवाहिनी पनवेलच्या हद्दीतून जाते आणि त्याच जलवाहिनीवरून शाब्दिक ‘कॉक फाईट’ रंगली आहे. पनवेलमध्ये टंचाईचा प्रश्न डोके वर काढताच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी “पाणी द्या; नाहीतर, पाण्याचा कॉक बंद करू,” असा इशारा दिला.  तो ऐकताच नवी मुंबईतही राजकीय पारा चढला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी लगेच प्रत्युत्तर देऊन ‘भूगोल’ समजावण्याचा प्रयत्न केला. “धरणे रायगडमध्ये आहेत, नियोजन आधी करायला हवे होते,” असा टोला लगावून त्यांनी वादाला ‘व्यावहारिक’ वळण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंच्या भूमिका पाहता हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. ‘पाणी’ मूलभूत विषय असताना तो ‘राजकीय मुद्दा’ बनताना दिसत आहे.

सापळ्याची अफवा खरी ठरली

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या २४ एप्रिलच्या स्थायी समितीच्या सभेला सर्व अधिकारी उपस्थित होते. मात्र महापालिकेच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याने अधिकारी पसार झाले असल्याचे सांगण्यात येत होते. त्या दिवसापासून रोज महापालिकेत सापळ्याची चर्चा होती. मात्र कोणाचा सापळा? कुठे लागला? कोणी तक्रार केली? याचा काही एक सुगावा लागत नव्हता. मात्र गुरुवारी भरत पटोळे या महापालिकेच्या लिपिकाला लाच घेताना अटक केली. त्यामुळे ही अफवा खरी ठरल्याने अफवा असल्याचे सांगणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Web Title : दुश्मनी भूली: शिंदे गुट ने राउत का स्वागत किया, पहले किया था विरोध।

Web Summary : ठाणे में राजनीतिक बदलाव! पहले विरोध के बावजूद, शिंदे गुट के सदस्यों ने संजय राउत का शादी में स्वागत किया। अन्य समाचारों में सार्वजनिक सुविधाओं पर भाजपा की लड़ाई, दिल्ली में राजनीतिक चर्चा, स्थानीय खेल भावना, पनवेल और नवी मुंबई के बीच जल विवाद और कल्याण-डोंबिवली में भ्रष्टाचार की गिरफ्तारी शामिल है।

Web Title : Rivals Unite: Shinde Camp Welcomes Raut Despite Past Opposition in Thane.

Web Summary : Political shifts in Thane! Despite prior opposition, Shinde's party members welcomed Sanjay Raut at a wedding. Other news includes BJP infighting over public amenities, political discussions in Delhi, local sportsmanship, water disputes between Panvel and Navi Mumbai, and a corruption arrest in Kalyan-Dombivli.