पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 05:42 IST2026-05-02T05:42:34+5:302026-05-02T05:42:58+5:30

मिसिंग लिंक प्रकल्पाचे थाटामाटात लोकार्पण, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास    

One stage of Pune-Mumbai travel dream completed, naming soon; 70000 crores boost to economy | पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती

पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती

मुंबई - आज मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई प्रवासाचे जे स्वप्न पाहिले होते त्याचा एक टप्पा पूर्ण होत आहे. आजपासून या प्रकल्पाला मिसिंग लिंक नाही, तर ‘कनेक्टिंग लिंक’ संबोधले जावे. तसेच त्याचे लवकरच नामकरण केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. 

‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल. या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. 

नियम मोडणाऱ्या वाहनांना चालान 
संपूर्ण मार्गावर २४ तास सीसीटीव्हीची देखरेख असून, लेनची शिस्त पाळली जावी, यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट घरी मोठ्या दंडाचे ई-चालान पाठविले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.

‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’वर काम सुरू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ ७-८ तासांत पोहोचता यावे, यासाठी सरकार ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’वर काम करीत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केले गाडीचे सारथ्य
मिसिंग प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वतः गाडीचे स्टिअरिंग हाती घेऊन मिसिंग लिंकमधून गाडी चालविली. यावेळी गाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार होत्या.

Web Title : पुणे-मुंबई मिसिंग लिंक परियोजना पूर्ण, जल्द होगा नामकरण

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस के अनुसार, मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना अब 'कनेक्टिंग लिंक' है। इससे राज्य की अर्थव्यवस्था को ₹70,000 करोड़ का बढ़ावा मिलने की उम्मीद है। उल्लंघन करने वालों के लिए ई-चालान के साथ इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम है। सरकार 'एक्सेस कंट्रोल ग्रिड' पर भी काम कर रही है।

Web Title : Pune-Mumbai Missing Link Project Completed, to be Named Soon

Web Summary : The Mumbai-Pune Missing Link project is now a 'Connecting Link,' says CM Fadnavis. Expected to boost the state's economy by ₹70,000 crore, the link features intelligent traffic management with e-challans for violators. The government is also working on an 'Access Control Grid'.