आंबेडकर- ओवेसी युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सापडला ‘गणराज्य संघ’ चा उतारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:30 PM2019-03-06T13:30:30+5:302019-03-06T13:38:24+5:30

वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे.

Ambedkar-Owaisi coalition Congress NCP's found option of 'ganrajya sangh' | आंबेडकर- ओवेसी युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सापडला ‘गणराज्य संघ’ चा उतारा 

आंबेडकर- ओवेसी युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सापडला ‘गणराज्य संघ’ चा उतारा 

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस राष्ट्रवादीचे पाठबळ : अडीचशे संघटनांचे एकत्रिकरणएकूण अडीचशे संघटना एकाच झेंड्याखाली एकत्र आल्याचा गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे यांचा दावा वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांचे विभाजन होईल या भीतीने आघाडीकडूनच गणराज्य संघाची निर्मिती

पुणे: वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे. गणराज्य संघ या संघटनेने पुढाकार घेत राज्यातील वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांना एकत्र आणून आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. एकूण अडीचशे संघटना एकाच झेंड्याखाली  एकत्र आल्याचा दावा यासाठी पुढाकार घेणाऱ्या गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. 
आंबेडकर व खासदार ओवेसी यांनी एकत्र येत वंचित विकास बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे. अलुतेदार, बलुतेदार यांना त्यांनी एकत्र आणले आहे. त्यांच्या सभाही होत आहेत. या सभांमधून आंबेडकर व ओवेसी सत्ताधारी भाजपाला कमी व काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावरच आगपाखड करीत आहेत. काँग्रेसने पुढे केलेला हात झिडकारत आंबेडकर यांनी तुम्ही प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचे धोरण जाहीर करा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीला तर रोज टिकेचे कोरडे ओढत आहेत. त्यामुळे धाबे दणाणलेल्या आघाडीने गणराज्य संघटनेचा उपाय शोधला असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगू लागली आहे. 
श्रीमती अंधारे यांच्यासह बहुजन रिपब्लिक्न सोशालिस्ट पाटीर्चे सुरेश माने, मानव हक्क अभियानचे डॉ. मिलिंद आवाड, गनिमी कावा संघटनेचे संजय जगताप, महाराष्ट्र युवा शक्तीचे सुनिल सौदागर, दंगल मुक्त महाराष्ट्रचे शेख सुभान अली अशा अनेक संघटनांनी मिळून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. गणराज्य च्या सुषमा अंधारे यांनी एकूण २५० संघटना असल्याचा दावा केला. यातील बहुतेक संघटना अराजकीय आहेत. गेली अनेक वर्षे जातीयवादाच्या विरोधात काम करत आहेत. सत्ताधारी भाजपाचा गेल्या साडेचार वषार्तील कारभार धर्मांध शक्तींना बळ देणारा, त्यांच्यासाठीच काम करणारा व सर्वसामान्य वंचित, उपेक्षितांकडे दुर्लक्ष करणारा होता. त्यांचा पराभव व्हावा, त्यांना पुन्हा सत्ता मिळू नये या एकमेव हेतूने आघाडीला पाठिंबा देत असल्याचे अंधारे यांनी जाहीर केले आहे.
आंबेडकरी चळवळीत उभी फूट असे याचे आघाडीकडून खासगीत वर्णन केले जात जात आहे. वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांचे विभाजन होईल या भीतीने आघाडीकडूनच ही निर्मिती केली असल्याचे बोलले जात आहे. अंधारे यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला नकार दिला. आम्ही कोणताही राजकीय इच्छा न बाळगता हा पाठिंबा देत आहोत. वंचित बहुजन विकास आघाडीबरोबर काँग्रेसची चर्चा सुरू आहे असे आम्हाला समजले आहे, त्यावर आम्हाला काहीही बोलायचे नाही, त्यांनी आघाडीत यावे, आमचा त्यांना विरोध नाही, पण निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असे अंधारे तसेच त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या अन्य संघटनांच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट केले. 

Web Title: Ambedkar-Owaisi coalition Congress NCP's found option of 'ganrajya sangh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.