महापालिकेने शास्ती माफी जाहीर केल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सर्वाधिक ६३ लाख रुपयांचा कर वसूल झाला असून, गेल्या दोन दिवसांत मनपाच्या तिजोरीत एक कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळला आहे. ...
शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचे बेकायदा भाडेकरार केल्याचे सिद्ध झाल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सय्यद आयुब बशीर या नागरिकाने धर्मादाय उपआयुक्त यांचेकडे केली आहे. ...
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात नाशिकच्या सराफाला अटक न करण्यासाठी एका तरुणामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारणारा संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व एका तरुणास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले ...
श्रीरामपूर भाजपच्या कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भूमिका नाही. पक्षाने प्रदेशस्तरावरून या निवडी केल्या असून पक्षातील प्रामाणिक लोकांना त्यात स्थान देण्यात आले आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पक्ष संघटनेत आरोप प्रत्य ...
श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर उत्तरेतील पक्ष संपविण्याचा आरोप करत श्रीरामपुरातील पक्षाच्या २३१ पैकी २१३ बूथ प्रमुखांनी शनिवारी पदाचे राजीनामे दिले. ज्या कार्यकर्ते व नेत्यांनी श्रीरामपुरात पक्ष वाढवला त ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गुरुजींनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. जुन्या आठवणीना उजाळा देत अण्णांना गुंडेगाव भेटीचे आमत्रंण दिले. अनेक विषयांवर दोघांची ...
शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी अडचण होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील भाजीपाला विक्रीच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी आडतदारांकडून करण्यात आली. त्यावर समितीकडून तातडीने दखल घेत, भाजीपाला विक्रीच्या वेळेत बदल केला. ही ...
इतर देशांतून केलेली आयात, साठेबाजीवर घातलेल्या निर्बंधामुळे कांद्याचे भाव निम्म्याने घटले आहेत. कांदा १० हजारांहून पाच हजारांवर खाली आला असून, पाडव्यानंतर कांदा पुन्हा भाव खाईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...