MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड

MI च्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला बुमराह?

By सुशांत जाधव | Updated: May 15, 2026 11:38 IST2026-05-15T11:34:53+5:302026-05-15T11:38:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs MI Jasprit Bumrah jokes about captaining ODI team after 100 percentage win record in IPL 'Only game that is left is ODI cricket' | MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड

MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड

मुंबई इंडियन्सच्या संघाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सवर सहा विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवला. धर्मशालातील सामन्यात २०१ धावांचा पाठलाग करताना तिलक वर्मानं षटकारासह मॅच संपवली. यंदाच्या हंगामातून पॅकअप झालेल्या मुंबई इंडियन्सची पहिल्यांदा कॅप्टन्सी मिळाल्यावर जसप्रीत बुमराहने सांगून पंजाब किंग्सचं प्लेऑफ्सचं गणित बिघडवण्याचा डाव यशस्वी ठरवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अंबानींप्रमाणे BCCI नेही कॅप्टन्सी देण्याचा विचार करावा

गेली १३ वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या बुमराहने पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करताना नाणेफेकीवेळी “आता आम्ही इतर संघांचं प्लेऑफ्सचं गणित बिघडवण्यासाठी खेळणार,” असं विनोदी शैलीत म्हटलं होतं. संघाने त्याची गोष्ट खरी करून दाखवल्यानंतर बुमराहनेही मजेशीर अंदाजात BCCI ने आता त्याच्यासाठी वनडे कॅप्टन्सीचाही विचार करावा, असं सूचक वक्तव्य केलं.

IPL 2026 मधील दमदार कामगिरीचं फळ! वैभव सूर्यवंशीसह या ५ खेळाडूंना टीम इंडियात संधी

MI च्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला बुमराह?

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना पहिल्याच सामन्यात विजय मिळाल्यावर भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज म्हणाला की, “मी कसोटी आणि टी-२० संघाचं नेतृत्व केलं आहे, आता फक्त वनडे संघाचं नेतृत्व करणं बाकी आहे,” विनोदी शैलीत त्याने वनडेत टीम इंडियाची कॅप्टन्सी करण्याची इच्छाच बोलून दाखवली. 

बुमराहचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड

२०२२ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहला कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची पहिली संधी मिळाली होती. या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. IPL मध्ये नेतृत्व करण्याआधी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्येही बुमराहाने दोन सामन्यात टीम इंडियाची कॅप्टन्सी केली.२०२३ मध्ये आयर्लंड दौऱ्यातील एका सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता तर १ सामना रद्द झाला होता.

MI असो वा टीम इंडिया बुमराहला नियमित कॅप्टन्सी मिळणं कठीण, कारण...

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. पण मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचे नियमित स्वरुपात कॅप्टन्सीत त्याचा विचार होणं कठीणच आहे. बुमराह हा एक जलदगती गोलंदाज आहे. दुखापतीमुळे अनेकदा त्याला मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन या ब्रम्हास्त्राचा योग्य वापर करण्यासाठी बीसीसीआय त्याच्या वर्कलोडवर विशेष भर देते. प्रत्येक सामन्यात त्याला खेळवण्यापेक्षा महत्त्वाच्या सामन्यात तो संघासाठी उपलब्ध असावा, अशी भूमिका BCCI ची आहे. त्यामुळे MI असो वा टीम इंडिया त्याच्याकडे नियमित कॅप्टन्सीची जबाबदारी मिळण्याचं गणित जुळून येणं कठीणच आहे.

Web Title : बुमराह की कप्तानी से पंजाब किंग्स का प्लेऑफ सपना टूटा, वनडे कप्तानी की मांग।

Web Summary : पहली बार एमआई का नेतृत्व करते हुए जसप्रीत बुमराह ने पीबीकेएस के खिलाफ जीत दिलाई, जिससे उनके प्लेऑफ की उम्मीदें टूट गईं। उन्होंने मजाक में वनडे कप्तानी की इच्छा जताई, जबकि टेस्ट और टी20 में अपनी पिछली नेतृत्व भूमिकाओं को स्वीकार किया। वर्कलोड प्रबंधन के कारण नियमित कप्तानी मुश्किल है।

Web Title : Bumrah's captaincy debut spoils PBKS's playoff hopes, demands ODI captaincy.

Web Summary : Jasprit Bumrah, leading MI for the first time, guided them to victory against PBKS, disrupting their playoff chances. He jokingly hinted at wanting the ODI captaincy, while acknowledging his previous leadership roles in Tests and T20s. His workload management makes regular captaincy unlikely.