Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:51 IST2026-05-15T11:48:25+5:302026-05-15T11:51:03+5:30

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. छताला बांधलेल्या पाळण्यासह पत्र्याचे छत उडून शंभर फूट अंतरावर जाऊन पडले. 

Sangli: Storm causes 9-month-old baby to fly into the air, falls to safety, but... | Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 

Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 

डफळापूर (जि. सांगली) : जोरदार वादळी वाऱ्याने जत तालुक्यातील मोटेवाडीत बुधवारी (दि. १३) भिंत पडून सहा भाविक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील खलाटी येथे वादळी वाऱ्याने एका घराचे छत हवेत उडाले. छताला बांधलेला पाळणा अन् पाळण्यात असलेले बाळही हवेत उडून कोसळले. यात बाळाचा दुर्दैवी अंत झाला. ज्या घरात जावळाची तयारी सुरू होती त्याच घरात बाळाच्या मृत्यूच्या सुतकाची काळी छाया पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन आनंदा शेजूळ (९ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. खलाटी (ता. जत) येथे बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. येथील मळ्यात राहणारे आनंदा बिरू शेजूळ यांच्या घराचे पत्रे उडाले. पाळण्याचे दोर छताला बांधले होते अन् छतासह पाळणाही हवेत उडाला. पाळण्यासह पत्र्याचे छत उडून शंभर फूट अंतरावर जाऊन पडले. मात्र, हवेत असताना बाळ घरात पडून त्यावर भिंत पडल्याने या दुर्घटनेत बाळाचा अंत झाला.

खलाटी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेजूळ वस्ती आहे. येथे पाच घरे लांब लांब अंतरावर आहेत, येथे मेंढपाळ आनंदा बिरू शेजूळ यांचे पत्र्याचे घर आहे. आनंदा शेजूळ हे मेंढ्या राखण्यासाठी रानात गेले होते. घरात आनंदाची पत्नी व लहान बाळ पाळण्यात झोपलेले होते. वादळी वाऱ्याने क्षणात या बाळाचा अंत झाला.

मातेच्या अंगावर पडली भिंत

वाऱ्याचा वेग वाढत असल्याने बाळाची आई प्रतिभा यांनी दरवाजा पडेल या भीतीने आतून कडी घालून दरवाजा हाताने जोरात पकडला होता. वाऱ्याचा वेग वाढतच गेला. छत उडेल याची तिला कल्पनाच नव्हती. छत उडाल्यानंतर जो दरवाजा पकडला त्या ठिकाणची भिंत कोसळली. मागील बाजूचा दरवाजाही आत कोसळला. यात बाळाची आई जखमी झाली.

बाळ बाळ म्हणून धावत सुटली

बाळाच्या आईला पाळणा उडून गेल्याची कल्पनाच नव्हती. दगड अंगावर पडल्यानंतर जखमी अवस्थेत तिने घरात पाळणा नसल्याचे पाहिले अन् बाळ बाळ म्हणत ती घराबाहेर पडली. शेजारच्या नातेवाइकांनी शोध घेतला, तर शंभर फुटावर पाळणा सापडला; पण बाळ नव्हते. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली ते सापडले. त्याला पाहताच आईने एकच हंबरडा फोडला. तिच्या आक्रोशाने सारेच हळहळले.

पत्र्याने झाडही कापले

घराच्या मागे असलेल्या शंकेश्वराच्या झाडावर जाऊन छत आदळले. पत्र्याचा जोराचा मार लागल्याने झाडाच्या फांद्या कापल्या गेल्या. पत्र्याच्या छताखाली दोरीसह पाळणा दबला गेला. ज्यावेळी पत्र्याचे छत हवेत भिरकावले गेले त्यावेळी पाळण्यातून निसटून ते बाळ घराच्या पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. बालकाला जत येथे उपचारासाठी नेले; परंतु जत येथील डॉक्टरांनी या बालकाला मिरज येथे उपचारासाठी घेऊन जाण्यास सुचवले. मिरज सिव्हिलमध्ये डॉक्टरांनी हे बालक मृत झाल्याचे सांगितले.

Web Title : सांगली: तूफान में हवा में उछाला गया 9 महीने का बच्चा, मौत

Web Summary : सांगली में, एक शक्तिशाली तूफान में 9 महीने के बच्चे की दुखद मौत हो गई। शिशु छत और पालने के साथ हवा में उड़ गया। बाद में, एक दीवार गिरने से घातक चोटें आईं। पास के कस्बों में बिजली गिरने से तीन अन्य लोगों की मौत हो गई।

Web Title : Sangli: 9-Month-Old Baby Dies After Being Thrown by Wind

Web Summary : In Sangli, a powerful storm tragically killed a 9-month-old baby. The infant was flung into the air with the roof and crib. Later, a collapsing wall caused fatal injuries. Three others died from lightning strikes in nearby towns.