जीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. ...
जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे. ...
आपण आत्मा (स्व) आणि मन यांच्यात काय फरक आहे, याबद्दल थोडे चिंतन करू या. आत्मा कधीही बदलत नाही, पण मन वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाचा चंद्राशी संबंध जोडला गेला आहे. (संदर्भ- शुक्ल आणि कृष्ण पक्षातील कलाकलाने बदलणारा चंद्र) ‘चंद्रमा मनसो-जयत ...
आपण सर्वांनी ऐकलं आहे ‘केल्याने होत आहे रे...’ परंतु आज मी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘‘दिल्याने येत आहे रे आधी दिलेची पाहिजे’’ हे महावाक्य आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला, उमजला आणि तुमच्यामध्ये रुजला तर तुमच्यामध्ये सुख नांदणारच. ...
माणूस जन्मतो तेव्हा तो एकटा, नागडा, हाडामांसाच्या अवयवांचा असतो. तो रडतो. ही त्याची जगण्याची अव्वल खूण. तो जगतो आणि एक दिवस मरतो. तेव्हा आसपासचे रडतात. म्हणजे सुरुवात रडणे आणि शेवट रडवणेने होतो. ...
विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला. ...
‘सिद्धांत व दृष्टांत’ या न्यायानुसार मानवाची जीवनगंगा वाहात असते. लहानपणापासूनच ‘सत्य वद’ हा धर्मशास्त्राचा सिद्धांत समजावून घेताना लाकुडतोड्याचा दृष्टांत पिढ्या न पिढ्या संक्रमीत झालेला हिंदू संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतो. असेच अनेक धर्ममूल्य नीत ...