शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

खडसे समर्थकांचे वेट ॲण्ड वॉच! राष्ट्रवादीत गोंधळ, प्रवेशाबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:46 IST

खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते होते, परंतु त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

प्रशांत माने कल्याण : भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये खडसे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खडसे यांच्यासह त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात आढावा घेतला असता काही समर्थकांनी खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची जोरदार तयारी केली आहे, तर काहीजण मात्र वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीत असलेला सावळागोंधळ पाहता ते राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते होते, परंतु त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. अपमानास्पद वागणुकीबाबत त्यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर उघडपणे भाष्य करत भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु, काही समर्थकांनी वेट ॲण्ड वॉचची घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

राष्ट्रवादीत गेल्यावर खडसेंना वरिष्ठ पातळीवर मोठे पद मिळेल, अशी आशा समर्थकांना आहे. परंतु, कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीची स्थिती आलबेल नाही. त्यातच, केडीएमसीची येऊ घातलेली निवडणूक पाहता समर्थकांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सध्यातरी त्यांचे मन तयार नाही. 

नाथाभाऊ यांचा पक्षप्रवेश होऊ दे. ते स्थिरावल्यावर पुढचा निर्णय घेऊ, अशी भूमिका काही समर्थकांनी घेतली आहे. तर, काहींनी मात्र सध्यातरी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

माळी राष्ट्रवादीच्या वाटेवरखडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्यासोबत कोणीही आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. परंतु, कल्याणमधील त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे. खडसे यांचे कट्टर समर्थक आणि भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळी हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. माळी हे कल्याणमधील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष आहेत. प्रवेश करताना या संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, असंघटित कामगार तसेच खान्देशातील काही मंडळी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती माळी यांनी दिली. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा