शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटीलेटर्सच्या ठेक्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारतांना ठाण्याच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 23:05 IST

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयासाठी दीड कोटींच्या व्हेंटीलेटर्सचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारणारा ठामपाचा वादग्रस्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्दे नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये सापळा ठाणे एसीबीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयासाठी दीड कोटींच्या व्हेंटीलेटर्सचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारणारा ठामपाचा वादग्रस्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाढत्या कोरोना रुग्णांसाठी ठामपाला ३० व्हेंटीलेटर्सची तातडीने खरेदी करायची होती. त्यासाठी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करुन नवी मुंबईच्या एका कंपनीकडून चार लाख ९५ हजारांमध्ये एक असे ३० व्हेंटीलेंटर्स एक कोटी ४८ लाख ५० हजारांमध्ये खरेदी केले जाणार होते. हा ठेका या कंपनीला मिळवून देण्यासाठी या रकमेतील दहा टक्के रक्कमेची म्हणजे १५ लाखांची मागणी मुरुडकर याने या कंपनीच्या प्रतिनिधीकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. कंपनीने ते मान्य करीत आधी पाच लाख आणि नंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हाप्ता मुरुडकरला त्याच्या ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात देण्याचेही ठरले. दरम्यान, कंपनीने याबाबतची तक्रार ठाणे एसीबीकडे केली. याची पडताळणी झाल्यानंतर हाच पाच लाखांचा पहिला हाप्ता घेतांना त्याला गुरुवारी (८ एप्रिल रोजी ) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.अलिकडेच, मुंब्रा येथील म्हाडाच्या बंद असलेल्या रुग्णालयातील १४ कोटींची व्हेटीलेटर्स तसेच अन्य कोरोना संबंधीची वैद्यकीय सामुग्री लंपास केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजू मुरुडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करण्यापूर्वीच डॉ. मुरुडकर याने ठामपाच्या रुग्णालयांमध्ये ठेवलेल्या या व्हेटीलेटर्ससह अन्य सामुग्री तातडीने म्हाडाच्या रुग्णालयात सुपूर्द केली होती. अर्थात, या सर्व बाबीसाठी पालिका प्रशासनाची पूर्व अनुमतीही घेतली होती, अशी सारवासारवही त्याने केली होती. पुन्हा एसीबीच्या या कारवाईने मुरुडकर याच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्र