शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार करणे ही काळाची गरज -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 12:27 IST

सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले .

डोंबिवली: सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे  प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले . येथील सावित्रीबाई फ़ुले कलामंदिरात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चार सत्रात पार पडणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले . या वेळेस क्रीडा भारती संस्थेचे राज चौधरी, संमेलनाचे  आयोजक कमलाकर क्षीरसागर , पदभनाभ गोखले, ऋषीकेश यादव ,डॉ सुनील पुणतांबेकर उपस्थित होते . क्रीडाभारती ,नॅशनल युथ ऑर्गनायझेशन ,आणि डोंबिवली सायकल क्लब यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. चव्हाण पुढे म्हणाले सायकलीमधून वीज निर्मिती होते आणि त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते हे निश्चितच चांगली गोष्ट आहे . स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल स्वारांसाठी विशेष प्लॅन आखला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले . लहानपणापासूनच सायकलशी नाते जडले. आमच्या वेळी भाड्याने सायकल घेण्याची पद्धत होती ,सायकल शिकताना एक वेगळाच आनंद मिळायचा . परंतु आजच्या घडीला सायकल चालवताना मुले सहसा दिसून येत नाही .डोंबिवली शहराने दर वेळेला नवीन उपक्रमाचा पायंडा घातला आहे .पहिले सायकल मित्र संमेलन हा त्याचाच एक भाग आहे असे चव्हाण म्हणाले. आनंदासाठी खेळा हे ब्रीद वाक्य क्रीडा भारती चे असून अशी संमेलन जिल्हा स्तरावर झाली पाहिजेत .सायकल हा आनंद देणारा व्यायाम आहे . कॉपीपेस्ट च्या जमान्यात अशा प्रकारची संमेलन आयोजित करून नवनिर्मिती चे प्रयोग केले पाहिजेत .सायकल ही  पर्यावरणाची गरज असून हीचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा असे आवाहन क्रीडा भारती चे महामंत्री राज चौधरी यांनी यावेळी केले . मुंबईत ज्या प्रमाणे दरवर्षी दुर्ग मित्र संमेलन आयोजित केले जाते . त्याच प्रमाणे डोंबिवलीत प्रतिवर्षी सायकल मित्र संमेलन होईल असे आयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले .  चार सत्रात हे संमेलन पार पडणार असून राज्यातील विविध सायकल क्लब चे प्रतिनिधी आणि विक्रमवीर सायकलपटूंनी उपस्थित लावली आहे .