क्लस्टरचा पहिला नारळ ऑक्टोबरमध्ये वाढवला जाणार असल्याचा दावा फोल ठरल्यानंतर आता डिसेंबरमध्ये पाच नागरी समूह आराखडे महासभेसमोर सादर करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. ...
रोटरी क्लबने पालघर मध्ये आयोजित ऍरो मॉडेलिंग शो मध्ये सुखोई-३०, तेजस, फिनिक्स ग्लायडर ह्या विमानाच्या प्रतिकृती असलेल्या विमानांच्या हवेतील चित्तथरारक कवायती पाहून उपस्थित हजारो विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. ...
नौपाडा पोलिसांच्या अटकेनंतर न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आदित्य फड या वकील पुत्राने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने उपचाराची न्यायालयाने परवानगी दिली. त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुक्यात नवीन ११ जि. प. शाळांना उच्च मध्यमिक वर्गाची वाढीव मान्यता देवून त्या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, या साहित्य खरेदीत घोळ करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले आहे. तर ...
सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. ...
भाडयाने घेतलेल्या गाडीच्या चालकाला लुटीसाठी त्याचे अपहरण करुन नंतर शहापूरजवळ त्याच्या डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या सशस्त्र टोळीला भिवंडीच्या नारपोली पोलिसांनी जेरबंद केली आहे. बिल्डर आणि बडया असामींना पिस्तूलाच्या धाकावर खंडणी वसूलीच्या तयारीत असत ...
वेगवेगळी बतावणी करीत दागिने लुबाडणा-या ठकसेनांच्या टोळीपैकी गुजरातच्या अर्जून सलाट आणि अर्जूनभाई मारवाडी या दोन भामटयांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे ...