भिवंडीत शेअरमार्केटच्या ब्रोकरला धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 08:59 PM2018-12-10T20:59:47+5:302018-12-10T21:02:15+5:30

भिवंडी : शहरात टेमघर येथील उच्चभ्रू वस्तीत रहाणाºया शेअरमार्केटची ट्रेडींग करणाºया ब्रोकरला हॉटेलमध्ये बोलावून धमकी देत खंडणी उकळणाºया दोघांना ...

The two arrested by the threatened stock market broker and threatened with ransom | भिवंडीत शेअरमार्केटच्या ब्रोकरला धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

भिवंडीत शेअरमार्केटच्या ब्रोकरला धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

Next
ठळक मुद्दे बोगस संस्थांचे ओळखपत्र दाखवून धमकी हॉटेलमध्ये स्विकारले ७० हजार रूपयेरक्कम स्विकारताना दोघांना पकडले पोलीसांनी

भिवंडी: शहरात टेमघर येथील उच्चभ्रू वस्तीत रहाणाºया शेअरमार्केटची ट्रेडींग करणाºया ब्रोकरला हॉटेलमध्ये बोलावून धमकी देत खंडणी उकळणाºया दोघांना पोलीसांनी अटक करून त्यांच्या पाच साथीदारांचा तपास पोलीस करीत आहेत.
टेमघर भागात अरिहंत सिटी वसाहतीत मनोज बारीक हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करून ब्रोकरचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना कल्याणरोड येथील उत्सव हॉटेलमध्ये शहरातील चार ते पाच युवकांच्या टोळक्याने बोलाविले. त्यापैकी तिनबत्ती येथील आलीशान इमारतीत रहाणाºया आसिफ जियाउद्दीन खान(२६)याने त्याच्याजवळील क्राईम इन्वेस्टिकेशन अ‍ॅण्ड डिक्टेशन ब्युरोचे कार्ड तसेच मानव अधिकार अपराध एवंम भ्रष्टाचार विरोधी संघटन या संस्थांचे ओळखपत्र दाखवित आम्ही क्राईमब्रान्चचे पोलीस आहोत असे सांगीतले.तसेच तुम्ही भिवंडीतील लोकांना फसविण्याचे काम करीत आहात.तुमच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकतो असे धमकावून मनोज बारीक यांच्याकडून २ लाख रूपयांची खंडणी मागीतली.शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या टोळीने कल्याणरोड येथील आनंद हॉटेल येथे मनोज बारीक यांस बोलावून त्यांच्याकडून ७० हजार रूपयांची खंडणी घेतली तर उर्वरीत रक्कम घेण्यासाठी काल रविवारी सव्वा दोन वाजता कल्याणरोड बायपास मार्गावर फ्लोरा हॉटेलमध्ये आले होते. तेथे खंडणी घेताना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.त्यापैकी तिनबत्ती येथे रहाणारा आासिफ जियाउद्दीन खान(२६) व त्याचा खाडीपार येथे रहाणारा साथीदार आदिल फारूक अन्सारी(२२)यांस आज रोजी अटक केली आहे.तर कलाम उर्फ कलामुद्दीन मोमीन याच्यासह ४ ते ५ साथीदार फरार झाले असुन त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The two arrested by the threatened stock market broker and threatened with ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.