सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:14 AM2024-04-30T04:14:39+5:302024-04-30T04:14:57+5:30

काँग्रेसकडून अटकेची मागणी

Sex scandal Prajwal's expulsion from the party Former Prime Minister Deve Gowda's family surrounded by allegations | सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले

सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले

बंगळुरू : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे कुटुंब सेक्स स्कँडलच्या आरोपांनी घेरले गेले आहे. देवेगौडा यांचा आमदार मुलगा एच.डी. रेवन्ना (६७) आणि खासदार नातू प्रज्वल रेवन्ना (३३) यांच्याविरुद्ध त्यांच्या मोलकरणीने लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सेक्स स्कँडलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताच जेडीएसने प्रज्वल रेवन्ना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर तर रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत काँग्रेसने कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत.

रेवन्नाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिला रडत आहेत आणि प्रज्वल हे व्हिडीओ शूट करत आहे, असा दावा करण्यात येत आहे.

‘आम्ही स्टोअरमध्ये लपून बसायचो’

रेवन्ना आणि प्रज्वल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या महिलेने सांगितले की, ती रेवन्ना यांची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. मोलकरीण म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर चार महिन्यांतच रेवन्ना तिचा छळ करू लागला.

त्याची पत्नी जेव्हा बाहेर असायची तेव्हा रेवन्ना कुठल्या ना कुठल्या बहाण्याने मला खोलीत बोलवायचा आणि नको तिथे स्पर्श करायचा. त्याची इतकी भीती होती की, तो येताच आम्ही स्टोअरमध्ये लपून बसायचो.

भाजपच्या नेत्याने दिला होता पेन ड्राइव्ह...

देवेगौडा यांच्या नातवाच्या ‘सेक्स स्कँडल’वरही पंतप्रधान गप्प राहतील का, असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. भाजपच्या एका नेत्याने भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून तसेच प्रज्वल रेवन्नाच्या अश्लील व्हिडीओंचा पेन ड्राइव्ह देऊन खरी परिस्थिती उघड केली होती, तरीही भाजपने जेडीएसबरोबर युती का केली, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला.

Web Title: Sex scandal Prajwal's expulsion from the party Former Prime Minister Deve Gowda's family surrounded by allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.