जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:38 AM2024-05-16T10:38:16+5:302024-05-16T10:43:48+5:30

गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाला गुन्हा गंभीर असला तरी मानुसकीच्या नात्याने जामीन मागत असल्याचे म्हटले होते. गोयल यांची पत्नी कर्करोगाने पिडीत असून डॉक्टरांनी ती काही महिनेच जगेल असे सांगितले असल्याचे साळवे यांनी म्हटले होते. 

Jet Airways' Naresh Goyal's wife Anita passed Away; got Bail due to her illness | जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन

जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन

जेट एअरवेजचे संस्थापक आणि जामिनावर बाहेर असलेले नरेश गोयल यांच्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले. गुरुवारी पहाटे तीन वाजता अनिता गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारी पत्नीसोबत राहण्यासाठी नरेश गोयल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यामुळे त्यांना सशर्त जामीन देण्यात आला होता.

नरेश गोयल यांनाही कर्करोग झाला आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये अंकिता यांचे निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनी लाँड्रिंगमध्ये तुरुंगात असलेल्या गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम वैद्यकीय जामीन दिला होता. 

गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाला गुन्हा गंभीर असला तरी मानुसकीच्या नात्याने जामीन मागत असल्याचे म्हटले होते. गोयल यांची पत्नी कर्करोगाने पिडीत असून डॉक्टरांनी ती काही महिनेच जगेल असे सांगितले असल्याचे साळवे यांनी म्हटले होते. 

Web Title: Jet Airways' Naresh Goyal's wife Anita passed Away; got Bail due to her illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.