शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Vidhan Sabha 2019: उल्हासनगरात कलानींच्या कोंडीचे भाजपकडून प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:45 AM

राष्ट्रवादीनेही गंगोत्री यांना संधी दिल्याची चर्चा

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौरपदाप्रमाणेच विधानसभेच्या उमेदवारीबाबत झुलवत ठेवून कलानी कुटुंबाच्या राजकीय कोंडीचे प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केल्याने त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांना बळ देत एकगठ्ठा सिंधी राजकारणाला खीळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याने त्या समाजातील नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागली आहे.एकेकाळी उल्हासनगरवर अनिर्बंध सत्ता गाजवणारे पप्पू कलानी तुरुंगात गेल्यावर त्यांच्या पत्नी ज्योती राजकारणात आल्या. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष असल्या, तरी मुलगा ओमी याने भाजपची वाट धरल्यापासून त्या पक्षापासून फटकून आहेत. यंदा त्या रिंगणात उतरणार नसल्याने पक्षाने पालिकेतील गटनेते भरत गंगोत्री यांना संधी दिली.त्याच वेळी भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी आणि महापालिका निवडणुकीपूर्वी त्या पक्षात गेलेला पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांच्यात विधानसभेसाठी प्रचंड स्पर्धा आहे. ओमी कलांनी यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त असल्याने उमेदवारीचा वाद चिघळू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याऐवजी त्यांची पत्नी विद्यमान महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे.ज्योती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असला, तरी आमच्या कुटुंबापैकी एक जण विधानसभेच्या रिंगणात असेल, असे वक्तव्य त्यांनी जाहीरपणे केल्याने भाजपने संधी न दिल्यास ओमी बंडखोरी करतील, अशी चर्चा रंगली आहे.याच गोंधळात शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागत प्रचार सुरू केला आहे. शिवसैनिकांनी ‘भावी आमदार’ असा उल्लेख करत सोशल युतीत ही जागा भाजपला सोडली नसल्याचे दाखवून दिले आहे. युतीचा भाग असलेल्या रिपाइंचे गटनेते व शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनीही गेल्या आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन प्रचारास सुरुवात केली. महायुतीत ही जागा रिपाइंला मिळेल, असा दावा भालेराव यांनी केला, तर वंचित आघाडीकडून सुधीर बागुल यांच्या नावाची चर्चा आहे.समर्थकांच्या हाती फक्त नाराजी!ओमी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्या टीमला उमेदवारी देताना भाजप नेत्यांनी चलाखीने त्यांना कमळ चिन्ह दिले. त्यामुळे सध्या आयलानींविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती काही उरलेले नाही. त्यामुळे आपले नगरसेवक असूनही आपल्यासोबत नाहीत. आई रिंगणाबाहेर आणि मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली, तर संपूर्ण कलानी कुटुंब विधानसभेच्या राजकारणाबाहेर जाईल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस