शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:46 IST

शेकडो लोकांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या उन्हात महिला अनेक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवर पोहोचतात आणि तिथून पाणी भरून परततात.

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात भीषण उन्हाळ्यासोबतच पाणीटंचाईचं संकट गडद होऊ लागलं आहे. जिल्ह्यातील राजाखेडी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या पायरी गावात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यावरून महिला, मुलं आणि वृद्ध डोक्यावर हंडे घेऊन पाणी वाहण्यास हतबल आहेत. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अद्याप यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

या गावात राहणाऱ्या शेकडो लोकांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या उन्हात महिला अनेक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवर पोहोचतात आणि तिथून पाणी भरून परततात. या कामात लहान मुलंही आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शाळा सोडून पाणी आणण्यासाठी बाहेर पडतात. पाचवीत शिकणारी कुमारी ज्योती सांगते की, "पाण्याच्या समस्येमुळे अभ्यासावरही परिणाम होत आहे."

पाइपलाईन टाकली, पण पाणी नाही

ग्रामस्थांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी प्रशासनाने घाईघाईत विहिरीपासून गावापर्यंत पाइपलाईन टाकली होती, पण आजतागायत त्यामध्ये मोटार बसवण्यात आलेली नाही. परिणामी गावापर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही. कोट्यवधींच्या योजना आणि 'हर घर जल'चे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात गावकरी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.

तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास

गावातील वृद्ध महिला आशा बाई सांगतात की, "आमचं संपूर्ण आयुष्य याच त्रासात गेलं. वयाच्या या टप्प्यावरही आम्हाला पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालावं लागत आहे." अनेकदा डोंगराळ वाटेवर पाय घसरून महिला जखमीही झाल्या आहेत, मात्र पोटाची तहान भागवण्यासाठी हा जीवघेणा प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही.

गावात मुलगी द्यायलाही लोक घाबरतात

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. निवडणुका आल्या की मोठी आश्वासनं दिली जातात, पण नंतर कोणीही विचारपूस करायला येत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, आता लोक लग्नासाठी आपली मुलगी या गावात द्यायला घाबरत आहेत. वेळेत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Severe water scarcity forces villagers to walk miles for water.

Web Summary : Villagers in Agar Malwa, Madhya Pradesh, face extreme water shortages, walking kilometers daily in scorching heat. Decades-long problem persists despite broken promises of piped water. People struggle for every drop.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWater Scarcityपाणी टंचाईWomenमहिला