1 / 5नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला गुरुवारी रात्री पकडण्यात यश आले. निदा खानविरोधात वेगवेगळ्या आरोपांखाली ४० गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिक पोलीस तिचा बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते.2 / 5धर्मांतर प्रकरणाचं बिंग फुटल्यानंतर निदा खान फरार झाली होती. पोलिसांनी तिचा मुंबईपर्यंत शोध घेतला, पण तिचा ठिकाणा मिळाला नाही. अखेर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली. शहरातील नारेगावमध्ये कौसर कॉलनीमध्ये निदा खान एका नातेवाईकाच्या घरी लपलेली होती.3 / 5 निदा खान मागील चार-पाच दिवसांपासून आई-वडील, भाऊ आणि मावशीसोबत तिथे राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच लोक होते. निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील काही वकिलांच्या संपर्कात होती.4 / 5तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना तिच्या ठिकाण्याबद्दल कळले. २० पेक्षा जास्त साध्या गणवेशातील पोलिसांचे पथक त्या भागात पाठवण्यात आले. मागील ३ ते ४ दिवसांपासून ते निदा खानच्या हालचालींवर नजर ठेवून होते. 5 / 5निदा खानला पोलीस कारवाईची कुणकुण लागू नये म्हणून या संपूर्ण कारवाईत पोलिसांचे वाहनही वापरण्यात आले नाही. निदा खान अटकेपासून वाचण्यासाठी नाशिक, ठाणे, भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर अशा शहरांमध्ये लपत होती. ७ मे रोजी अखेर तिला अटक करण्यात यश आले.