शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:18 IST

1 / 12
Numerology Astrology: तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय हा नवीन अध्याय सुरू झाला आहे. अभिनेता विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत प्रस्थापित राजकारणाला मोठा धक्का दिला. कोणालाही बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आणि घटनात्मक पेचात विजय अडकल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 12
Thalapathy Vijay Kundali: बहुमताच्या ११८ पैकी काँग्रेस आमदारांसह ११२ आमदारांचा पाठिंबा असूनही विजयच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. लोकभवनाचे खेटे घालूनही अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. विजयची चित्रपटातील यशस्वी कारकीर्द, स्टारडम आणि राजकारणात मिळालेले प्रचंड यश हे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असेच आहे.
3 / 12
Thalapathy Vijay Numerology: चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर, जोसेफ विजय चंद्रशेखर यांनी आता राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एक यशस्वी आणि लोकप्रिय राजकारणी होण्यासाठी, एखाद्याच्या कुंडलीत काही विशिष्ट ग्रह आणि नक्षत्र बलवान असणे आवश्यक असते, असे म्हटले जाते.
4 / 12
Thalapathy Vijay Astrology: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार विजय थलपती हा अवघ्या दोन वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात सामील झाला आणि तोच आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे. विजयच्या प्रचंड विजयामागे राहु ग्रहाचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. कारण राहु हा जीवनातील अचानक बदलांसाठी ओळखला जातो. विजयचा राजकारणातील प्रवेश आणि झटपट यश हे याचेच उत्तम उदाहरण असल्याचे मानले जाते.
5 / 12
विजय थलपती यांचा जन्म २२ जून १९७४ रोजी झाला आणि अंकशास्त्रानुसार त्यांचा मूलांक २२ आहे, म्हणजेच २ + २ = ४. अंकशास्त्रानुसार, मूलांक ४ चा स्वामी राहु ग्रह आहे. राहुची सकारात्मक स्थिती व्यक्तीला राजकारणातील राजा बनवते, असे सांगितले जाते.
6 / 12
मूलांक ४ असलेले लोक अचानक होणाऱ्या बदलांसाठी आणि चौकटीबाहेरच्या विचारांसाठी ओळखले जातात. यात राहु महत्त्वाची भूमिका बजावतो. राहु हा धोरणांचा कारक ग्रह आहे. त्याची शुभता व्यक्तींना राजकारणात मोठ्या उंचीवर पोहोचवू शकते. राहु एक मायावी ग्रह असून, त्याचा प्रभाव मूलांक ४ च्या लोकांना अद्वितीय बनवतो, असे मानले जाते.
7 / 12
विजय थलपतीच्या कुंडलीत राहु महादशा आहे. थलपती विजय यांच्या कुंडलीत शुभ बुध आणि शुक्र ग्रह आहेत. बुध मिथुन राशीत सूर्य आणि शनिसोबत युतीत आहे. मिथुन राशीतील सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे, तसेच सूर्य आणि शनिची युती मिथुन राशीतच आहे.
8 / 12
कुंडलीतील शुक्र आणि केतु युतीमुळे चित्रपट आणि माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. मोठ्या जनसमुदायाचा पाठिंबाही मिळाला आहे. वृषभ राशीतील शुक्र आणि केतु युतीमुळे मिळालेल्या प्रचंड जनसमर्थनाला बुधादित्य राजयोगाने राजकारणात योग्य दिशा दिली आहे.
9 / 12
मूलांक ४ मुळे विजय थलपथी यांना आकस्मिक अपयश आणि आकस्मिक यश या दोन्हींचा अनुभव आला. काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त घटना घडली, परंतु असे असूनही राहुने ४ मे रोजी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत मोठे यश मिळवून दिले
10 / 12
जेव्हा राहू यश देतो, तेव्हा तो ते मोठ्या तीव्रतेने देतो आणि अपयशही तितकेच तीव्र असते. राहु बुधाच्या राशीत शुभ फळे देतो आणि त्याला बुधाचा मित्र मानले जाते. थलपती विजय याने वर्षाच्या पाचव्या महिन्यापासून सुरू झालेल्या बुधाच्या प्रभावासह राहुच्या आशीर्वादाने महत्त्वपूर्ण यश मिळवले, असे म्हटले जात आहे.
11 / 12
राहु हा कलियुगाचा अधिपती ग्रह मानला जातो. हा ग्रह आकस्मिक चढ-उतार, रणनीती आणि असामान्य यश आणतो. मूलांक ४ असलेले लोक अनेकदा 'उशिरा यशस्वी होणारे' असतात, म्हणजेच त्यांना ३५-४० वर्षांनंतर खरे यश मिळते. थलपती विजयची कारकीर्द अशीच आहे. विजयने अनेक वर्षे संघर्ष केला, पण योग्य वेळ आल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंत सर्व काही स्वतःच्या पद्धतीने मिळवले.
12 / 12
राहु प्रभावामुळे प्रचंड विजय मिळाला असला तरी, त्यांच्या कुंडलीतील शनि स्थिती काही विलंब आणि अडथळे दर्शवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यास वेळ लागू शकतो. ग्रहस्थितीनुसार, भविष्यात सर्वोच्च पदावर पोहोचण्याची त्यांची शक्यता प्रबळ आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषThalapathy Vijayथलपती विजयTamilnaduतामिळनाडूAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६PoliticsराजकारणShani Devशनि देवspiritualअध्यात्मिक