शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या सहीअभावी रखडली सहल, केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदावर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 00:42 IST

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल महापालिकेच्या लालफितीत अडकली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी निविदा ...

- जान्हवी मोर्येडोंबिवली : केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल महापालिकेच्या लालफितीत अडकली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी निविदा काढून ती मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवली. मात्र, दोन महिने उलटूनही मंजुरी न मिळाल्याने यंदा विद्यार्थ्यांचे सहलीचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. याआधी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून निविदेला मंजुरी मिळताच जानेवारीत सहल काढण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. जानेवारीही संपत आल्याने आता उन्हाळी सुटीत सहल काढणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.केडीएमसी शाळेतील विद्यार्थी निम्न आर्थिक स्तरातील असतात. त्यामुळे त्यांना सहलीचा फारसा आनंद घेता येत नसल्याने केडीएमसीतर्फे सहलीचे आयोजन केले जाते. त्यासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पात सहलीसाठी आर्थिक तरतूद केली आहे.महापालिका शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने सहलीला नेले जाते. यंदा पहिली ते चौथीच्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांची सहल किडझेनिया येथे नेली जाणार आहे, तर पाचवी ते आठवीच्या साधारण चार हजार विद्यार्थ्यांची सहल मुरबाडमधील वाळिंबे येथील मंदार कृषी तंत्रनिकेतन येथे नेण्यात येणार आहे.यावर्षी सहलीची निविदा वेळेत मंजुरीसाठी गेलेली आहे. त्यासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही संबंधित अधिकारी सांगत होते. मात्र, आता प्रशासन फेबु्रवारीत सहल काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निविदाच मंजूर नसल्याने यंदा सहल जाईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. परिणामी ते सहलीच्या आनंदापासून मुकण्याची शक्यता आहे.दहा वर्षांत आतापर्यंत दोनदाच सहलफेबु्रवारीपासून शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू होते. दहा वर्षांत आतापर्यंत दोनदाच या शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद घेता आला आहे.मागच्या वर्षी तांत्रिक अडचणीमुळे सहल नेता आली नव्हती. या ना त्या कारणाने प्रशासन विद्यार्थ्यांच्या हौसेवर पाणी फेरत असल्याची टीका होत आहे.सहलीसाठी दिलेली निविदा अजून मंजूर झाली नाही. पण लवकरच त्याला मंजूरी मिळेल. फेबु्रवारीपर्यंत सहल जाईल. यंदा विद्यार्थ्यांची सहल नक्की जाणार आहे.- जे. जे. तडवी, शिक्षण विभाग अधिकारी, महापालिका

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSchoolशाळा