शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

...अन् पोलिसांनी पकडली तब्बल १० लाखांची बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:52 AM

मुंबईतून चोरी झालेली बाईक घोडबंदर परिसरात पकडली

ठाणे : घोडबंदर परिसरात रविवारी पहाटे कासारवडवली पोलिसांनी मुंबईतून चोरी झालेली सुमारे १० लाख किमतीची स्पोर्ट्स मोटारसायकल वाहीद मंजूर खान (रा. आंबिवली, कल्याण) याच्याकडून हस्तगत केली आहे. त्याला या मोटारसायकलसह मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागलाबंदर भागात कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव हे आपल्या पथकासह २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गस्त घालत होते. त्याच दरम्यान त्यांना एक संशयित मोटारसायकलस्वार आढळून आला. त्याची चौकशी केली असता, वाहीद खान अशी त्याने स्वत:ची ओळख सांगितली. मात्र, त्याच्याकडील महागड्या स्पोर्ट्स मोटारबाइकच्या मालकीबाबत तसेच बाइकच्या कागदपत्रांची मात्र तो पूर्तता करू शकला नाही. त्याच्यावर संशय बळावल्याने सखोल चौकशीमध्ये त्याने ही मोटारसायकल मुंबईतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरल्याची कबुली दिली. हा प्रकार उघड झाल्याने मोटारसायकलसह त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे खैरनार यांनी सांगितले.