शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाण्यातील धक्कादायक प्रकार: मृत्यूनंतर फेसबुक अकाऊंटवरुन आली फ्रेंड रिक्वेस्ट

By जितेंद्र कालेकर | Updated: July 13, 2020 01:28 IST

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या एका सहकारी बँकेचे सह व्यवस्थापक अजित रानडे यांच्या फेसबुक अकांऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट टाकून काही जणांकडे ठकसेनांनी पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे बनावट खाते असून त्याद्वारे कोणीही व्यवहार करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपैसे उकळण्यासाठी ठकसेनांची शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीनच दिवसांपूवी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या एका सहकारी बँकेचे सह व्यवस्थापक अजित रानडे यांच्या फेसबुक अकांऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट टाकून काही जणांकडे ठकसेनांनी पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणाकडेही पैशांची मागणी केली नसून कोणीही या खात्याशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन रानडे कुटूंबीय तसेच नौपाडा पोलिसांनी केली आहे.रानडे यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आलेले खाते हे बनावट असल्याचीही माहिती समोर आली आहे. विशेष ज्यांना ज्यांना ही रिक्वेस्ट पाठविण्यात आली, अशा १० ते १५ जणांकडे या ठकसेनाने प्रत्येकी ३५ हजारांची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.५५ रानडे यांचे ७ जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये ९ जुलै रोजी अजित रानडे या नावाने त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी तसेच बँकेतील त्यांचे सहकारी यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. रानडे यांचे निधन झाल्याचे त्यांच्यापैकी बहुतांश जणांना माहित होते. त्यामुळे या फ्रेंड रिक्वेस्टचा अनेकांना धक्काच बसला. अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. काहींनी अजित यांचे भाऊ तसेच इतर नातेवाईकांना फोन करून अजित रानडे यांचे खरोखर निधन झाले का? अशीही चौकशी केली. विशेष म्हणजे मित्रमंडहींप्रमाणेच अजित रानडे यांच्या मुलीला, भावाला देखील ही फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. कोणीतरी अजित रानडे यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून सर्वाना एकाच वेळी रिक्वेस्ट पाठविल्याचे रानडे कुटूंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फेसबुककडेही याबाबतची तक्रार करुन हे बनावट खाते बंद करण्याची विनंती केली. ज्यांनी ही रिक्वेस्ट मान्य त्यांना एका मेलद्वारे रानडे यांना पैशांची तातडीची गरज असल्याचे भासविण्यात आले. पेटीएमद्वारे ३५ हजार रुपयांची यात मागणी करण्यात आली. अनेकांनी त्यांच्या कुटूंबियांकडे याबाबतची खातरजमा केली तेंव्हा अनेकजण फसवणूक होण्यापासून वाचले. 

अजित रानडे यांचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले असून त्यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची पैशांची मदत त्यांनी किंवा नातेवाईकांनी मागितलेली नाही. या खात्याशी कोणीही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन रानडे यांचे भाऊ मिलिंद रानडे तसेच नौपाडा पोलिसांनी केले आहे. 

‘‘ मुळात, नागरिकांनीही कोणत्याही अनोळखी फ्रेंन्ड रिक्वेस्ट तसेच आपण हिरो सारखे दिसता वगैरे सारख्या लिंक बघू नये. तरीही अशी एखादी फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. तर प्रत्यक्ष याबातची खातरतमा करुनच व्यवहार करावेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात बनावट फेसबुक खाते तयार करुन पैशांची मागणी करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.’’निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक, नौपाडा.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुक