शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

100 इलेक्ट्रिक बसचे कंत्राट सापडले वादात; बस देण्यास विलंब, कंत्राट रद्द करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 08:45 IST

ठाणे महापालिकेच्या सेवेत इलेक्ट्रिक बस सामील होणार होत्या. त्या केव्हा येतील, असा सवाल पाटणकर यांनी यावेळी केला. यासंदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख विनोद गुप्ता यांनी १०० इलेक्ट्रिक बस घेण्यासंदर्भात साडेतीन वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर केल्याचे सांगितले.

ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत प्रदूषणविरहित बस सहभागी करून घेण्यासाठी साडेतीन वर्षांपूर्वी १०० इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या काळात एकच बस दाखल झाल्याने संबंधित कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी महासभेत केली. त्यावर नियमानुसार १५ दिवसांची वाट पाहून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे आश्वासन महापालिकेच्या विद्युत विभागाने बुधवारी महासभेस दिले.ठाणे महापालिकेच्या सेवेत इलेक्ट्रिक बस सामील होणार होत्या. त्या केव्हा येतील, असा सवाल पाटणकर यांनी यावेळी केला. यासंदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख विनोद गुप्ता यांनी १०० इलेक्ट्रिक बस घेण्यासंदर्भात साडेतीन वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर केल्याचे सांगितले. पीपीपी तत्त्वावर या बस घेतल्या जाणार होत्या. त्यानुसार, त्याने सुरुवातीला एक बस पालिकेला दिली होती. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने १० अशा स्वरूपात वर्षभरात १०० बस देणार होता. परंतु, त्याने उर्वरित ९९ बस दिलेल्या नाहीत.  २० एप्रिल २०२० पर्यंत या बस सहभागी होतील, असेही सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही या बस आलेल्या नाहीत.

तीनवेळा बजावली नोटीस -संबंधित ठेकेदाराला तीन वेळा नोटीसही बजावण्यात आलेली आहे. आता पुन्हा नोटीस बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी पाटणकर यांनी केली. बसच मिळत नसतील, तर ठेकेदाराचे लाड कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, जर बस सहभागी होत नसतील, तर कायदेशीर प्रक्रिया पाहून ठेका रद्द करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका