शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

सोशल मीडियाला आवरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 2:45 AM

मानवतेला काळिमा फासणाऱ्या हैदराबादमधील दिशा प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मानवतेला काळिमा फासणाऱ्या हैदराबादमधील दिशा प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा अत्याचारांच्या घटनांना सोशल मीडियादेखील कारणीभूत असून त्याला आवर घालण्याची गरज, वाचकांनी व्यक्त केली आहे. पॉर्न साईटस्वर पूर्ण बंदी घालावी. सोशल मीडियावर मुले काय करताहेत याकडे पालकांनी लक्ष द्यावे. तसेच पुरुषप्रधान समाजाची एकूणच मानसिकता बदलायला हवी. कायदेसाक्षरता निर्माण व्हावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

असं का घडतंय वारंवार?

हैद्राबादमधील क्रूर, निर्दयी घटनेने समाजमन परत एकदा ढवळून निघाले़ का घडतंय हे वारंवार? एक स्त्री म्हणून मनाला अत्यंत वेदना देणारा हा प्रश्न आहे. याची बीजं समाजाच्या मानसिकतेत तसेच शासनाच्या उदासिन न्यायप्रणालीत दडलेली आहेत़ काही प्रमाणात मीडियादेखील कारणीभूत आहे़ बलात्काराचा गुन्हा घडल्यानंतर सहा महिन्याच्या आत अंतिम निर्णय लागलाच पाहिजे व निर्णयानंतर त्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणीही झाली पाहिजे़ पिडीत कोणत्याही ठाण्यामध्ये गेल्यास सबब न सांगता त्वरित गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे़ परस्त्री मातेसमान या शिवबांच्या संस्काराची आज गरज आहे.

- डॉ़ रेखा पाटील चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड़

संवेदनशील माणसांचा तोटा

समाज माध्यमावर कोणाचेच नियंत्रण नाही. सरकारने समाज माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचे ठरविले तरी यंत्रणा राबविणारी संवेदनशील माणसे असतील का? असा प्रश्न निर्माण होतो. महिलांवरील अत्याचारात वाढ होण्यामध्ये समाज माध्यमेही जबाबदार आहेत. बलात्कार कसा झाला हे पाहण्यासाठी ध्वनीचलचित्रफिती ( व्हिडिओ) शोधणाऱ्यांना कायद्याच्या भाषेत ‘आॅनलाईन स्टॉकिंग’ म्हणतात. ते कसे करतात ते शोधून त्यावरही उपाययोजना केली पाहिजे.- आवदा व्हिएगस, मडगाव-गोवा.

मुलांचे कुतुहल शमवावे

घरातील वातावरण कसे आहे, आई-वडिलांमध्ये परस्परांबद्दल किती आदर आहे, मित्र-मैत्रिणींशी त्यांची वागणूक कशी आहे? याकडे मुलांचे बारीक लक्ष असते. आजही पालक टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात आली की चॅनेल बदलतात. जेव्हा मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण देत नाही तेव्हा त्यांचा मनातले कुतूहल वाढते आणि ती उत्तरे ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. जी आता इंटरनेटमुळे शोधणे खूप सोपे झाले आहे. फक्त माहिती मिळणे महत्त्वाचे नाही तर ती योग्य माध्यमाद्वारे मिळणे महत्त्वाचे आहे.- निहारा सोनावणे, उलवे

न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास

आपल्या समजात आजही स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात. बलात्कारासारख्या हिंसेची बीजे सामाजाच्या रानटी मानसिकतेत सापडत असताना, बलात्कारासारख्या जीवघेण्या, गलिच्छ आणि अमानुष घटनांना पायबंद न बसणे हा खरेतर समजाचाच प्रभाव आहे. कारण याची मुळे पुरुषी पाशवी विचारांच्या चिखलात घट्ट रुतलेली असल्याचे रोज वर्तमानपत्रातील बातम्यांमधून दिसून येत आहे. बलात्कार करणारा नराधम झालेला असतो. त्याला नात्याची जाण राहात नाही. त्याला स्त्रीमधील माणूस दिसत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्यांअभावी खटले प्रलंबित राहतात लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास बसत नाही. बुरसटलेली पुरुषी विचारसरणी बदलत नाही, तोपर्यंत अशा कळ्या कुसकरण्याचा प्रयत्न वारंवार होतच राहाणार.- प्राची प्रमोद कांदळगावकर, माजी नायब तहसीलदार, मुंबई उपनगर

मानसिकता बदला, समाज बदलेल

मुळात सोशल मीडीया हे एक वरदान, एक प्लॅटफॉर्म आहे. काही मूर्ख लोक याचा चुकीचा वापर करतात. त्यामुळे या माध्यमाला दोष देणे चुकीचे ठरेल. मुळात लोकांची मानसिकता बदलायला पहिजे. आत्तापासूनच शाळा, कॉलेजमधे लैंगिक शिक्षण अनिवार्य केले तर अशा गोष्टी घडणार नाहीत. कारण निव्वळ कुतुहलापोटी असं सगळ होत आहे. पालकांचा आपल्या तरुण पिढीशी संवाद अतिशय गरजेचा आहे. घराघरात सुसंवाद निर्माण झाला तर लपून पॉर्न बघितले जाणार नाही. बलात्काºयांना फाशी ही एकच शिक्षा आहे.- सुजीता वैभव काकिर्डे, कांचन गंगा, ठाणे - पूर्व.

सोशल मीडियाच जबाबदार कसा?

सोशल मीडियामुळे अजाण वयातच कामक्रीडेविषयी विकृत आणि अवाजवी उत्सुकता निर्माण होते आहे आणि त्यातील आनंदाचा, परस्पर संमतीचा भाग कळण्यापूर्वीच, भोग म्हणून पाहायची वृत्ती बळावत चालली आहे. स्त्री शरीर खेळणे वाटावे, इतके त्याचे उत्तान प्रदर्शन अगदी रोजच्या वर्तमानपत्रातही दिसते. जोपर्यंत स्त्रीला एक माणूस म्हणून बघायची वृत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. मीडियाचा वापर यासाठी करायला हवा. नुसत्या पॉर्न साईट बंद करून खूप फरक पडेल असे नाही, तर प्रत्येक मीडियातून अशा उत्तान प्रतिमांचा वापर बंद होणे गरजेचे आहे. सोबतच, जबाबदारीची जाणीव होण्यासाठी सेक्स एज्युकेशन आणि मानसिकतेत बदल घडवण्यासाठी संस्कारांचा स्तर वाढवण्यासाठी मुळातून प्रयत्न व्हायला हवेत.- अर्चना ठोसर, अंधेरी

लैंगिकतेचा चुकीचा प्रसार

समाजमाध्यमांना पूर्णपणे जबाबदार धरून आपले हात झटकून मोकळे व्हावयाचे, याला काहीएक अर्थ नाही. काही प्रमाणात सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीच्या लैंगिक शिक्षणाचा प्रसार होतो तर काही लोक सोशल मिडीयाचा गैरवापर करतात. सोशल मीडिया आणि हल्लीच्या चित्रपटांतून देहप्रदर्शनाला अति प्राधान्य दिले जाते. त्यामुळे समाजात चुकीचे संदेश पोहचतात. स्त्रियांनी समाजातील प्रत्येक कामात सहभाग नोंदविला असताना, स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे या मानसिकतेचे समाजाने उच्चाटन करणे गरजेचे आहे.- शीतल जावळे, चिखली , जि. बुलडाणा.

जीवाचा तीळपापड होतो

कोळसा झालेला हैद्राबाद येथील पीडितेचा देह टीव्ही वर बघितल्यापासून मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. व्हाट्स अप , फेसबुक, टष्ट्वीटर, गुगल, यु ट्यूब, इंस्टाग्राम ज्यावेळी प्रचलित नव्हते तेंव्हा गुन्हे वा बलात्कार होत नव्हते असे नाही; परंतु त्याचे प्रमाण फार कमी होते. हल्ली दिवसा, दोन दिवसाला बलात्काराच्या बातम्या दिसतात. लहान मुली ते म्हाताºया बायांपर्यंत मजल गेलेली दिसतेय. इतकी वासनांधता आली कुठून? एक स्त्री म्हणून कणव करावी की चीड भरायची या हतबलतेत जीवाचा तीळपापड होतो. समाजमनावर सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव आहे. एक मेसेज, एक व्हिडीओ अगदी एका सेकंदात सगळीकडे व्हायरल होतो.

अश्लील फोटो बघत बसणे, गाफील करून वा धमकावून एखाद्या मुलीचे फोटो, व्हिडीओ बनविणे व सोशल मीडियावर अपलोड करणे अनेकदा फेसबुक बघताना असे लक्षात आले की प्रत्येकवेळा दोन तीन तरी सेक्सशी संबंधित व्हिडीओ किंवा लिंक्स त्यावर येतात. त्यावर टच करताच त्या ओपन होतात, नंतर तशा व्हिडीओज ची रांगच खाली दिलेली असते. एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करणे, परस्परांचे डीपी बघणे, वारंवार ते बदलणे, स्टेटस बघणे, चॅटिंगच्या माध्यमातून सॉफ्ट कॉर्नर तयार होणे, विवाहित, अविवाहित दोन्ही गटांची प्रेमप्रकरणं, लफडी निर्माण होणे, व्हिडीओ कॉल्स वरून परस्परांना न्यूड दिसणे, भेटीची मागणी करणे, सहमतीने संभोग अन्यथा विनासहमतीने बलात्कार..! त्यातून आत्मक्लेश, नैराश्य, नकारात्मकता आणि असुरक्षितता निर्माण होऊन समाजात विकृतता रुजली आहे.

हा मीडिया प्रत्येकाच्या आवडीनिवडी ओळखून घेतो आणि त्याचप्रकारचे मेसेजेस, व्हिडीओज त्याच्या समोर आणतो, वारंवार आणतो. त्यात व्यक्ती कुतूहलापोटी गुंततो आणि परिणामी उध्वस्त होतो. कोणत्या दिशेने वाटचाल करतोय ह्याचे उत्तरच सापडत नाही. या विकृतीला संपुष्टात आणायचे असेल तर सोशल मीडियावर आणि समाजाने त्याच्या वापरावर मर्यादा आणायला हवी.- गीता देव्हारे-रायपुरे, जनता कॉलेज चौक, सिव्हिल लाईन्स - चंद्रपूर.

सोशल मीडियामुळे होते जनजागृती

सोशल माध्यमांचा वाढता वापर यामुळे महिला अत्याचारात वाढ होते आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचे कारण म्हणजे आपण त्या माध्यमाचा कशापद्धतीने वापर करतो हे आहे. याउलट फेसबूक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात जनजागृती वाढत आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते. आजकाल सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. याचा परिणाम संबंधित व्यक्ती, तिच्या संपर्कातील इतर व्यक्तीसह एकूणच तिच्या व्यक्तिमत्त्वावर होत असल्याचे दिसून येते. पूर्वी आपल्या ओळखीची चार दोन माणसे त्यांच्याबरोबरचा रोजचा होणारा संवाद एवढी काय ती आपली सोशल होण्याची मर्यादा होती.

आता त्याचा परीघ बराचसा विस्तारला आहे. मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत असणाºया ‘मी टू’ च्या चळवळीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगणारा होता. सोशल माध्यमे हे दुधारी शस्त्र असून, त्याची परिणामकारकता वापरकर्त्यावर अवलंबून आहे. हे प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे. अमूक एखादी व्यक्ती ज्यावेळी फेसबुकवर दुसºया अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा तिने सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीशी काय बोलतो, तिला कुठली माहिती सांगतो इतकेच नव्हे तर आपले जी वैयक्तिक गोष्ट आहे त्याबद्दल सांगतो तेव्हा ते आपल्याकरिता धोकादायक ठरणार असते. हे आपल्याला त्यावेळी समजत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिस