शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:34 AM

गुगलचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

ठळक मुद्देगुगलने प्रीपेड युजर्ससाठी सर्चच्या माध्यमातून मोबाईल रिचार्जची सुविधा आणली आहे.गुगलच्या या फीचरच्या मदतीने फक्त युजर्स स्वत: च्याच नाही तर दुसऱ्यांच्या नंबरवरही रिचार्ज करू शकतात.  एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल यांच्या प्रीपेड प्लॅन्सचा समावेश

नवी दिल्ली - गुगलचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे. गुगलने प्रीपेड युजर्ससाठी सर्चच्या माध्यमातून मोबाईल रिचार्जची सुविधा आणली आहे. गुगलचं हे नवं फीचर युजर्सना अँड्रॉईड फोनवर Google Search चा वापर करताना प्रीपेड मोबाईल प्लॅन्स शोधण्याची, तुलना करण्याची आणि रिचार्ज करण्याची सुविधा देतं. तसेच गुगलच्या या फीचरच्या मदतीने फक्त युजर्स स्वत: च्याच नाही तर दुसऱ्यांच्या नंबरवरही रिचार्ज करू शकतात. 

गुगलच्या या फीचरमध्ये एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल यांच्या प्रीपेड प्लॅन्सचा समावेश आहे. गुगलच्या या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये prepaid Mobile recharge, Sim recharge किंवा recharge असे शब्द टाकून सर्च करा. सर्च रिझल्टमध्ये मोबाईल रिचार्ज सेक्शन (Mobile recharge Section) दाखवला जाईल. युजर्सना येथे मोबाईल नंबर, टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्किल हे पर्याय भरावे लागतील. 

सर्चमध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती काहींना भरलेली दिसेल. त्यानंतर ब्राऊज प्लॅन्स (Browse Plans) वर क्लिक करा. गुगल त्या टेलिकॉम ऑपरेटरचे सर्व उपलब्ध असलेले प्रीपेड प्लॅन्स दाखवेल. त्यामध्ये युजर्स त्यांच्या आवडीचा रिचार्ज प्लॅन निवडू शकतात. प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर व्हॅलिड ऑफर्सची एक लिस्ट समोर येईल. त्यानंतर युजर्स ऑफर प्रोव्हायडर्सवर टॅप करू शकतात. 

सध्या Freecharge, MobiKwik, Google Pay आणि Paytm सारखे प्रोव्हायडर्स लिस्टेड आहेत. युजर्सनी ट्रान्झेक्शन पूर्ण केल्यानंतर प्रोव्हायजरच्या कन्फर्मेशन पेजवर  Back to Google बटण देण्यात आले आहे. त्यावर क्लिक केल्यास युजर्स सर्चवर परत येऊ शकतात. कन्फर्मेशन पेजवर युजर्सना रिचार्जसाठी कस्टमर सपोर्ट इन्फॉर्मेशनचा अ‍ॅक्सेस दिला जातो. काही दिवसांपूर्वी गुगलने Tangi नावाचे अ‍ॅप आणले आहे. त्यामुळे टिकटॉकला तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. टँगी या अ‍ॅपद्वारे छोटे क्रिएटीव्ह व्हिडीओ अपलोड करता येणार आहेत. यामध्ये युजरना नवीन गोष्टी शिकायला मिळणार असून हे व्हिडीओ मित्रांसोबतही शेअर करता येणार आहेत.

गुगल Tiktok ची 'टांग' खेचणार; छोट्या व्हिडीओंसाठी अ‍ॅप आणले

सध्या वेबसाईट आणि अ‍ॅपल प्लेस्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. टँगी अ‍ॅप अँड्रॉईडसाठी कधी उपलब्ध केले जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. Tangi चा इंटरफेस दिसायला जवळपास पिंटरेस्ट आणि इन्स्टाग्रामसारखाच आहे. यामध्ये एक सर्चबार देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही खास विषय सर्च करू शकता. टँगीमध्ये तुम्ही 60 सेकंदापर्यंत व्हिडीओ अपलोड करू शकता. याशिवाय एखाद्या व्हिडीओवर कमेंट टाकण्याचाही पर्याय मिळणार आहे. व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ट्राय इटवर क्लिक करावे लागणार आहे. हे व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला एक अकाऊंट बनवावे लागणार आहे.

'या' बातम्या ही नक्की वाचा

अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग

Mi Super Sale 2020 : Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स

WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स 

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना

यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा

 

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान