Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:14 AM2020-02-04T11:14:46+5:302020-02-04T11:17:59+5:30

फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.

delete your browsing history on facebook follow these steps to manage settings | Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

Next
ठळक मुद्देफेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुकवर नको असलेल्या जाहिराती ऑफ करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आला आहे.फेसबुकने Clear History Tool युजर्सला दिलं आहे ज्याच्या मदतीने सोशल नेटवर्किंग साईटवर ब्राऊजिंग डेटा डिलीट करता येणार.

नवी दिल्ली - फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळ्या साईटशी संबंधित अनेक जाहिराती या फेसबुकवर दाखवल्या जातात. त्या ऑफ करता येतात. फेसबुकवर नको असलेल्या जाहिराती ऑफ करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने ब्राऊजिंग डेटा देखील क्लिअर करता येतो. फेसबुकने Clear History Tool युजर्सला दिलं आहे ज्याच्या मदतीने सोशल नेटवर्किंग साईटवर ब्राऊजिंग डेटा डिलीट करता येणार आहे. 

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी हे नवं टूल सर्व युजर्ससाठी रोलआउट केल्याची माहिती एका ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. सेटिंग मेन्यूमध्ये दिसणाऱ्या या ऑप्शनला ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी हे नाव देण्यात आलं आहे. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुकने हे टूल दिलं आहे. याच्या मदतीने युजर्स आपला डेटा कोणत्या साईटसोबट शेअर करू शकतात किंवा हटवू शकतात हे सिलेक्ट करू शकतात. फेसबुकवरून ब्राऊजिंग हिस्ट्री डिलीट करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्याबाबत जाणून घेऊया.

'या' स्टेप्स करा फॉलो

- फेसबुकवर सेटिंग्स आणि प्रायव्हसी मेन्यूमध्ये जा. या मेन्यूमध्ये देण्यात आलेल्या सेटिंग्सवर क्लिक करा. 

- स्क्रोल केल्यानंतर ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी ऑप्शनवर दिसेल.

- पेजवर ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी काय आहे आणि ते कसं मॅनेज करायचं यासाठी ऑप्शन देण्यात आला आहे. 

- ऑफ फेसबुक ऑक्टिव्हिटी मॅनेज करण्यासाठी आणि सेटींगमध्ये बदल केल्यास तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल. 

- पासवर्ड टाकल्यानंतर ज्या साईटसोबत तुमचा डेटा शेअर झाला आहे. तसेच ज्यांची ब्राऊजिंग हिस्ट्री फेसबुकवर सेव्ह केलेली आहे त्याची एक लिस्ट दिसेल. 

- क्लिअर हिस्ट्रीचा एक ऑप्शन मिळेल. असं केल्यास त्या साईटवरून लॉग आऊट करता येईल. फेसबुकच्या मदतीने लॉग इन असलेल्या साईटवरून लॉग आऊट व्हाल. 

- या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर क्लिअर हिस्ट्री ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचा डेटा क्लिअर करा. 

लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स

फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण फेसबुक लवकरच युजर्ससाठी प्रायव्हसीच्या दृष्टीने चार नवीन दमदार फीचर्स आणणार आहे. कंपनीनं आपलं प्रायव्हसी चेकअप टूल अपडेट केलं आहे. फेसबुकने चार नवीन फीचर्स रोल आऊट केले आहेत. यामध्ये युजर्स अकाऊंटची सुरक्षितता जास्त उत्तमपणे आता मॅनेज करू शकतात. तसेच आपल्या माहितीवर कंट्रोल ठेवू शकतात. कंपनीने 2014 मध्ये प्रायव्हसी चेकअप टूल लाँच केलं होतं. मात्र आता लवकर फेसबुकच्या या टूलचं अपडेटेड व्हर्जन रोल करण्यात येणार आहे. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

गुगल Tiktok ची 'टांग' खेचणार; छोट्या व्हिडीओंसाठी अ‍ॅप आणले

Google Maps ला एका कलाकाराने हॅक केले; कोंडी दिसल्याने वाहतूकच वळली

स्मार्टफोनची बॅटरी लवकर कमी होते?, 'या' ट्रिक्स करतील मदत

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

 

Web Title: delete your browsing history on facebook follow these steps to manage settings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.