स्मार्टफोनची बॅटरी लवकर कमी होते?, 'या' ट्रिक्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 12:38 PM2020-02-03T12:38:03+5:302020-02-03T12:46:48+5:30

स्मार्टफोन हा प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र अनेकदा सातत्याने फोनचा वापर केला जात असल्याने फोनची बॅटरी लवकर लो होते.

कामाच्या वेळी फोनची बॅटरी लो झाली अथवा फोन बंद झाला तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बॅटरी लवकर लो होण्यामागे अनेक कारणं आहे. मात्र बॅटरी दीर्घकाळ टिकून राहील यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया.

इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फोनची 40 टक्के बॅटरी ही इंटरनेट डेटासाठी खर्च होते. मोबाईल डेटाच्या ऐवजी वायफायचा वापर करा. यामुळे फोनची बॅटरी लाईफ वाढेल.

अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बॅटरी सेव्हिंग मोडचा वापर करता येतो. अँड्रॉईडमध्ये ऑप्शन पॉवर सेव्हिंग मोड नावाने तर iOS मध्ये लो पॉवर मोड या नावाने आहे.

स्मार्टफोनवर व्हिडीओ स्ट्रीमिंग कमी केल्यास बॅटरीचं लाईफ वाढू शकतं. व्हिडीओ स्ट्रीमिंगमुळे खूप पॉवर कंज्यूम होते.

फोनची बॅटरी वाचवण्यासाठी फोनचा ब्राईटनेस कमी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. तसेच अँड्रॉईड 10 फोनमध्ये डार्क मोडचा पर्याय मिळतो याचा वापर केल्यास बॅटरीचं लाईफ वाढतं.

स्मार्टफोनमध्ये एअरप्लेन मोड देण्यात आलेला असतो. ज्या वेळी फोनचा वापर हा केला जात नाही त्यावेळी फोन एअरप्लेन मोडवर ठेवा जेणेकरून बॅटरी लवकर लो होणार नाही.