अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:08 PM2020-02-12T15:08:13+5:302020-02-12T15:32:34+5:30

स्मार्टफोन हल्ली सर्वच जण अनलॉक करतात. फोनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिन, पॅटर्न किंवा मग पासवर्डचा वापर केला जातो. तसेच सध्या फेस अनलॉक फीचरचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

युजर्स व्यतिरिक्त इतर कोणीही फोन अनलॉक करू नये यासाठी भन्नाट पॅटर्न अथवा पासवर्ड ठेवले जातात. मात्र अनेकदा काहीजण पासवर्ड विसरतात. त्यामुळे फोन अनलॉक करणं कठीण होतं. अवघ्या 10 सेकंदात फोन अनलॉक कसा करायचा हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी दुसऱ्या मोबाईलवर अथवा कम्प्यूटरच्या ब्राउजरमध्ये जावून https://myaccount.google.com/find-your-phone-guide यूआरएल टाईप करा. त्यानंतर ओके करा. जीमेल अकाउंटवरून लॉग इन करा.

लॉक असलेल्या फोनमध्ये ते जीमेल अकाऊंट ओपन असणं गरजेचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व स्मार्टफोनची यादी मिळेल.

तुमचा जीमेल अकाऊंट ओपन केलेला असेल अशा फोनची यादी असेल. ज्या फोनचं लॉक ओपन करायचं आहे तो फोन सिलेक्ट करा.

तुमच्या स्क्रीनवर लॉक युअर फोनचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर नवीन पासवर्ड पिन किंवा पॅटर्न टाका. यामुळे फोनचा पासवर्ड बदलेल. यानंतर फोन अनलॉक होईल. मात्र यासाठी इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे.

फोन अनलॉक करण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत आहे. यासाठी गुगल असिस्टेंटची मदत घ्यावी लागेल. गुगल असिस्टेंट आधीच सेट असेल किंवा व्हाईस रेकॉर्ड असेल तर ‘Unlock with voice’ चा पर्याय निवडा. त्यानंतर केवळ ‘Ok Google’ करा. तुमचा स्मार्टफोन अनलॉक होईल.