शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Facebook, Instagram Down: फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; युजर्संना लॉग इन करताना अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 2:42 AM

युजर्संना फोटो, व्हिडीओ आणि न्यूज फीड लोड करतेवेळी ही समस्या येत होती.

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम गुरुवारी रात्री उशिरा डाऊन झाले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लॉग इन करताना अडचणी आल्या. तसेच, युजर्संना फोटो, व्हिडीओ आणि न्यूज फीड लोड करतेवेळी ही समस्या येत होती.

डाऊन डेक्टरच्या माहितीनुसार, ही तांत्रिक समस्या गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. भारतासह जगभरातील युजर्संना अँड्राईड आणि आयओएसवर इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरताना समस्या आली. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर रीफ्रेश केल्यानंतर पेस ओपन होण्यास वेळ लागत होता. तसेच, यावर वेबसाइट्स लोड करण्याचा प्रयत्न करीत असताना, एरर संदेश दिसत असल्याच्या तक्रारी युजर्संनी केल्या आहेत.

कंपनीकडून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र,  दोन्ही सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यानंतर ट्विटरसह इतर सोशल मीडियावर यासंदर्भातील मीम्सचा वर्षाव सुरु झाला. यावेळी युजर्संनी अनेक विनोदी मीम्स पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. युजर्स यानंतर सध्या ट्विटरवर तक्रार करत असल्याने #FacebookDown आणि #InstagramDown ट्रेंड होत आहेत.इन्स्टाग्रामच्या जवळजवळ 5000 हून अधिक युजर्संनी ही समस्या नोंदवली आहे, तर साधारण 224 युजर्संनी फेसबुकवर फीड लोड होत नसल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम