शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत बांधावर’; कांद्यात शिरलं पाणी अन् होत्याचं नव्हतं झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:57 IST

बार्शी तालुका ; घोकला होता भाव सहा हजार, हाती आला नासका कांदा

ठळक मुद्देबार्शी तालुक्यात कांदा आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले शासनही आता  कुठे हलले असून, पंचनामे करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरूबघूया कधी मदत मिळतेय, अशी बोलकी प्रतिक्रिया बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : यावर्षी पावसाळ्यात अल्प पाऊस पडला़ चला म्हटले आपल्याकडे थोडेसे पाणी आहे. कांद्याला दरही चांगला आहे. कांदा लावू म्हणून दोन एकरावर कांदा लावला़ खते टाकून दुहीच्या फवारण्या करून तो चांगल्या पद्धतीने जोपासला. कांदा काढायला आला आणि इकडे परतीचा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली़  हा पाऊस कमी की काय म्हणून २० आॅक्टोबरला चांदणी नदीला मोठे पाणी आले व हे सर्व पाणी कांद्याच्या पिकात शिरले. संपूर्ण कांदा हा जागेवरच नासला. डोळ्यात अश्रू आणत कांदलगावच्या बालाजी शिनगारे या शेतकºयानं आपली व्यथा सांगितली.

बालाजी यांना जेमतेम अडीच एकर जमीऩ दरवर्षी ते कांदा, तूर अशा पिकांचे उत्पादन घेतात़ यावर्षी त्यांनी अतिशय उत्तम  पद्धतीने  कांदा जोपासला होता़  यंदा कांद्याला दरही चांगला होता़ चांगले पैसे झाले असते. मात्र नियतीला ते मान्य नसावे़ आम्हाला परतीचा पाऊस एवढा पडेल, असे कधीच वाटले नव्हते़ मात्र तो इतका पडला की आमचे मोठे नुकसान करून गेला.

 ज्यावेळी आम्ही शिनगारे यांच्या शेतात गेला तेव्हा ते कांद्याच्या पिकात अक्षरश: धाय मोकलून रडत होते़ आमचे इकडे नुकसान झालंय अन् या पुढाºयांना सरकारचे पडलंय असे म्हणत ते शेतातील एक-एक कांदा उपटून दाखवत होते. तेव्हा प्रत्येक कांदा हा नासलेला दिसत होता़ वरून पात तर हिरवीगार दिसत होती़ मात्र आतून कांदा जादा पाणी लागल्याने नासून गेला होता.

सरकारच्या नावाने खडे...- मुख्यमंत्री तर कोणीही होईल हो, पण एक दिवसाचा शेतकरी होऊन पाहा, असे म्हणून सरकारच्या नावाने खडे फोडले़ शिनगारे यांना या कांद्यापासून एक रुपयाचे देखील उत्पन्न मिळणे शक्य नाही़  बार्शी तालुक्यात कांदा आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ प्रशासनही आता  कुठे हलले असून, पंचनामे करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे, बघूया कधी मदत मिळतेय, अशी बोलकी प्रतिक्रिया बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळ