पदवी नाही तरी २० वर्षे केली प्रॅक्टिस! रुग्णांच्या जीवाशी खेळणारा बोगस डॉक्टर गजाआड; स्वतःच्याच घरात लपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 20:08 IST2026-05-08T20:08:51+5:302026-05-08T20:08:51+5:30

बार्शीत गेल्या २० वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

1. Bogus Doctor Arrested in Barshi Practiced Medicine Without Degree for 20 Years. | पदवी नाही तरी २० वर्षे केली प्रॅक्टिस! रुग्णांच्या जीवाशी खेळणारा बोगस डॉक्टर गजाआड; स्वतःच्याच घरात लपला

पदवी नाही तरी २० वर्षे केली प्रॅक्टिस! रुग्णांच्या जीवाशी खेळणारा बोगस डॉक्टर गजाआड; स्वतःच्याच घरात लपला

Barshi Bogus Doctor: बार्शी येथे वैद्यकीय पदवी नसताना तब्बल २० वर्षांपासून दवाखाना थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभागाने छापा टाकून क्लिनिक सील केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, तो स्वतःच्याच घरात लपून बसल्याची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी गुरुवारी सात मे रोजी रात्री उशिरा कारवाई करत त्याला अटक केली. 

आरोग्य विभागाच्या धडक कारवाईनंतर बोगस डॉक्टर शंकर मनोहर पाठक हा पसार झाला होता. बार्शी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. दरम्यान, आरोपी शंकर पाठक हा उपळाई ठोंगे येथील त्याच्या राहत्या घरातच लपून बसल्याची खात्री लायक माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, धनाजी केकान आणि पोलीस नाईक नागनाथ आंधळे यांच्या पथकाने तातडीने उपळाई ठोंगे येथे धाव घेतली. घराची झडती घेतली असता आरोपी तिथेच मिळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी केकाने करीत आहेत.

कोणतीही पदवी नसल्याची कबुली...

गेल्या २० वर्षांपासून स्वतःला बीएएमएस डॉक्टर भासवून शंकर पाठक हा अॅलोपॅथी औषधांचा बेकायदेशीर वापर करत होता. बार्शीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लक्ष्मण पाटील यांच्यासह आरोग्य व महसूल विभागाच्या पथकाने ५ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक छापा टाकला होता. पंचांसमक्ष त्याने आपल्याकडे कोणतीही पदवी नसल्याची कबुली दिली होती

Web Title: 1. Bogus Doctor Arrested in Barshi Practiced Medicine Without Degree for 20 Years.