महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:43 PM2021-09-23T14:43:17+5:302021-09-23T19:27:41+5:30

एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’.

woman carries extra luggage in airplane with help of pillow | महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर

महिलेचा जुगाड पाहुन माराल कपाळावर हात, विमानात एक्स्ट्रा लगेज नेण्यासाठी केला 'याचा' वापर

googlenewsNext

आजच्या युगात प्रत्येकजण जुगाड करण्यात अव्वल आहे. जुगाडचे अनेक व्हिडीओ (Trending Videos) किंवा किस्से समोर येत असतात. अशा परिस्थितीत, आता एक बातमी (Amazing Travel Hacks) समोर येत आहे, ज्यात एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’, रिपोर्ट्सनुसार, या महिलेने विमानात जाताना ही युक्ती केली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.

जास्तीचे पैसे भरावे लागू नये म्हणून कधी तुम्ही तुमचं सामान कमी केलं आहे का? अनेक प्रवासी हे अतिरिक्त शुल्क भरावं लागू नये म्हणून जास्तीचे सामान घेऊन जात नाहीत, जेणेकरून त्यांना विमानतळावर काही गोष्ट सोडाव्या लागणार नाहीत, काही लोक कपड्यांचा थर घालून ही गोष्ट टाळतात, काही लोक आपलं सामान लपवण्यासाठी बनावट बेबी बम्पचा अवलंब करतात.  यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. एका महिलेनं अतिरिक्त पैसे न देता विमानात अधिक सामान नेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तुम्हाला फक्त एका उशीची गरज आहे.’

अन्या लाकोव्लीएव्हानं इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आपले कपडे उशीच्या कव्हरमध्ये ठेवत आहे आणि हे उशीचे कव्हर काढून तिच्या प्रवासाला जाण्याची तयारी करताना दिसत आहे. त्यानंतर अन्या लाकोव्लीएव्हाने या उशीला तिच्या सुटकेसच्या वर ठेवलं आणि ती योग्यरित्या सेट केली. यशस्वीरित्या विमानात चढल्यानंतर अन्या यांनी उशीला मिठी मारली आणि त्यासोबत लिहिलं, ‘बेस्ट ट्रॅव्हल हॅक एव्हर.’

Web Title: woman carries extra luggage in airplane with help of pillow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.