हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 06:02 PM2020-05-30T18:02:48+5:302020-05-30T18:03:40+5:30

राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Heartwarming video, 99-year-old woman prepares food packets for migrants in Mumbai svg | हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video

हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video

Next

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 45,653 इतकी झाली आहे. त्यापैकी 26 लाख 71,440 रुग्ण बरे झाले असून 3 लाख 67,116 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 74,020 इतकी झाली आहे. 82,676 रुग्ण बरे झाले असले तरी 4981 जणांना मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारपर्यंत  62228 इतकी झाली होती. त्यापैकी 26997 रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33124 ऍक्टिव्ह रुग्ण होते. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असलेल्या मजूरांचे झाले. त्यामुळे त्यांचा जन्मगावी जाण्यासाठी आटापीटा सुरू आहे. त्यांच्या मदतीलाही अनेक जण पुढे येत आहे. जमेल तसं प्रत्येक जण आपापल्या परीनं मजूरांना मदत करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हृदयस्पर्शी व्हिडीओत 99 वर्षांच्या आजीबाई मजूरांसाठी जेवण पॅक करताना दिसत आहेत. या आजीबाई मुंबईच्या असल्याचा दावा केला जात आहे.

कराचीतील वकिल झाहीद इब्राहीम यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्या कॅप्शनवरून या आजीबाई त्यांच्या आत्या असल्याचे समजत आहे. या व्हिडीओत त्या आजी एका अॅल्युमिनिअम फॉईल पेपरमध्ये चपात्या आणि ठेचा किंवा चटणी पॅक करताना दिसत आहेत.  

पाहा व्हिडीओ


नेटिझन्सकडून होतंय कौतुक...
 




 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!

कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली

युवराज सिंगचं मुंबईतील घर लय भारी; विराट कोहलीच्या घरापेMigrated Galleriesक्षा डबल महाग!

बोंबला; क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्याला कोरोनाची लागण

बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!

जुलै महिन्यात 'ही' टीम करणार इंग्लंड दौरा; जाणून घ्या कधी व कुठे खेळणार 

तेव्हा गेल व रसेल म्हणाले होते, पाकिस्तान उपांत्य फेरीत येऊ नये ही भारताची इच्छा; पाक खेळाडूचा दावा

Web Title: Heartwarming video, 99-year-old woman prepares food packets for migrants in Mumbai svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.