युवराज सिंगचं मुंबईतील घर लय भारी; विराट कोहलीच्या घरापेक्षा डबल महाग!

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा दमदार खेळाडू आहेच. त्यानं 2000च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची झलक दाखवली होती आणि त्यानंतर टीम इंडियातूनही त्यानं अनेक धमाकेदार खेळी केल्या.

2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धची त्याची तुफानी फटबाजी असो किंवा 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरी, युवीनं आपल्या खेळीनं नेहमीच चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं.

युवी हा नेहमीच एक स्टायलिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्टाईलचे चाहतेही तितकेच आहे. अशा या स्टायलिश युवीचं मुंबईचं घरही तितकंच आलीशान आहे.

युवीनं मुंबईतील वरळी येथे 16 हजार स्क्वेअर फिटचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे.

त्यानं ज्या इमारतीत अपार्टमेंट खरेदी केलं आहे, त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचेही घर आहे. पण, युवीच्या घराची किंमत ही विराटच्या घरापेक्षा डबल आहे.

architecturaldigest.in या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार युवीनं 16000 स्क्वेअर फिटचं अपार्टमेंट 60 कोटींना खरेदी केलं आहे.

ओमकार 1973 टॉवरच्या C wing मध्ये युवीनं संपूर्ण 29 वा मजला खरेदी केला आहे.

याच टॉवरमध्ये कोहलीनं घर खरेदी केलं आहे. युवीनं त्याच्या अपार्टमेंटसाठी 40000 प्रती स्क्वेअर फिट इतकी रक्कम मोजली आहे.

विराटनं 2016मध्ये याच टॉवरमध्ये 35व्या माळ्यावर घर खरेदी केलं. त्याच्या घराची किंमत 34 कोटी इतकी आहे.

रोहित शर्माचेही वरळीत घर आहे आणि इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तनुसार 2017मध्ये त्यानं खरेदी केलेल्या घराची किंमत ही 30 कोटी आहे.