तेव्हा गेल व रसेल म्हणाले होते, पाकिस्तान उपांत्य फेरीत येऊ नये ही भारताची इच्छा; पाक खेळाडूचा दावा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं त्याच्या आत्मचरित्रात इंग्लंड संघाच्या वन डे वर्ल्ड कप विजयासंदर्भात लिहिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 04:22 PM2020-05-30T16:22:01+5:302020-05-30T16:22:53+5:30

whatsapp join usJoin us
India didn't want to see Pakistan qualify for the semi-finals, claim by mushtaq Ahmed and abdul razzaq svg | तेव्हा गेल व रसेल म्हणाले होते, पाकिस्तान उपांत्य फेरीत येऊ नये ही भारताची इच्छा; पाक खेळाडूचा दावा

तेव्हा गेल व रसेल म्हणाले होते, पाकिस्तान उपांत्य फेरीत येऊ नये ही भारताची इच्छा; पाक खेळाडूचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं त्याच्या आत्मचरित्रात इंग्लंड संघाच्या वन डे वर्ल्ड कप विजयासंदर्भात लिहिले आहे. या स्पर्धेत यजमान इंग्लंडसमोर करो वा मरो सामन्यात टीम इंडियाचे आव्हान होते. याच सामन्यातील निकालावर पाकिस्तानचेही स्पर्धेतील भवितव्य अवलंबून होते. पण, इंग्लंडने हा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखले. त्यानंतर इंग्लंडने इतिहास रचला. पण, या सामन्यात टीम इंडियाच्या महेंद्रसिंग धोनीकडून जिंकण्यासाठी प्रयत्न न झाल्याचा दावा स्टोक्सने त्याच्या पुस्तकात केला होता. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी आरोपांचे सत्र सुरू केले.

बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!

जुलै महिन्यात 'ही' टीम करणार इंग्लंड दौरा; जाणून घ्या कधी व कुठे खेळणार 

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तनं सिकंदरने ट्विट करून लिहिले की,''वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ मुद्दाम इंग्लंडकडून पराभूत झाला, असं बेन स्टोक्सनं त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी भारतानं ही खेळी केली. याची भविष्यवाणी मी आधीच केली होती.'' यावर बेन स्टोक्सनं रिट्विट करून लिहिले की,''असं लिहिलेलं तुम्हाला शोधून सापडणार नाही. मी असं कधी बोललोच नाही. याला शब्दांसोबत खेळणे असे म्हणातात.''

पण, आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज अब्दुल रझ्झाकनेही यात उडी मारली आहे. तो म्हणाला,''भारतीय संघ मुद्दाम हरला, यात काहीच शंका नाही. मी हे त्याही वेळेस म्हटले होते. धोनीसारखा फलंदाज मैदानावर असूनही चौकार-षटकार मारत नव्हता.''


पाकिस्तानचा माजी खेळाडू मुश्ताक अहमद यानेही असाच दावा केला आहे. तो म्हणाला,''गतवर्षी मी वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघासोबत काम करत होतो. इंग्लंडकडून भारत पराभूत झाल्यानंतर जेसन होल्डर, ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांनी मला सांगितले की, पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करू नये अशी भारताची इच्छा होती.''

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 337 धावा केल्या. जॉनी बेअरस्टो ( 111), बेन स्टोक्स ( 79) आणि जेसन रॉय ( 66) यांनी फटकेबाजी केली. भारताला प्रत्युत्तरात 5 बाद 306 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं 102 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं  (66) अर्धशतक झळकावलं. हार्दिक पांड्या ( 45) आणि महेंद्रसिंग धोनी ( 42*) यांनी संघर्ष केला.

मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!

कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली

युवराज सिंगचं मुंबईतील घर लय भारी; विराट कोहलीच्या घरापेक्षा डबल महाग!

बोंबला; क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्याला कोरोनाची लागण

Web Title: India didn't want to see Pakistan qualify for the semi-finals, claim by mushtaq Ahmed and abdul razzaq svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.