Florida st augustine man throws watermelon in alligator s open jaws viral video | VIDEO : मगरीने जबडा उघडताच माणसाने कलिंगड टाकलं आणि मग...
VIDEO : मगरीने जबडा उघडताच माणसाने कलिंगड टाकलं आणि मग...

फ्लोरिडातील सेंट अगस्टाइन एलिगेटर फार्म जूलॉजिकल पार्कमध्ये (St. Augustine Alligator Farm Zoological Park) असं काही झालं, जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या पार्कमध्ये अनेक मगरी आहेत. त्यांची काळजी येथे घेण्यात येते. त्यातील एक मगर आपला जबडा उघडून शांत बसला होता. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे आली आणि तिने एक कलिंगड त्या मगरीच्या थेट तोंडामध्ये टाकलं. पण त्यानंतर जे झालं ते खरचं अंगावर शहारे आणणारं होतं. 

सेंट अगस्टाइन एलिगेटर फार्म जूलॉजिकल पार्कमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंटरनेट सेन्सेशन बनला असून नेटकरीही व्हिडीओतील दृश्य पाहून हैराण झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच 'WOW' म्हणाल. हा व्हिडीओ सेंट अगस्टाइन एलिगेटर फार्म जूलॉजिकल पार्कच्या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

12 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मगरीच्या तोंडामध्ये कलिंगड टाकतो. कलिंगड टाकल्यानंतर काही क्षणातच मगर ते खाऊन टाकते. या व्हिडीओमध्ये स्लो-मोशन वर्जनही दाखवण्यात आलं आहे. 

सेंट अगस्टाइन एलिगेटर फार्म जूलॉजिकल पार्कच्या ऑफिशिअल पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ 8 ऑगस्टला पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत त्याचे 20 हजारांपेक्षा जास्त व्यूज झाले आहेत. तर 113 शेअर्स आणि 300 पेक्षा जास्त लाईक्स, कमेन्ट्स मिळाले आहेत. 

अनेक लोकांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन्स दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हे पाहायला फआर छान वाटत आहे.' तसेच आणखी एका यूजरने लिहिलं की, 'मगरीच्या जबड्यात भयंकर ताकद असते.'


Web Title: Florida st augustine man throws watermelon in alligator s open jaws viral video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.