शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga: कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर, सरपंच पदासाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी

By सुधीर राणे | Updated: April 8, 2025 16:54 IST

कणकवली : कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज, मंगळवारी काढण्यात ...

कणकवली : कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज, मंगळवारी काढण्यात आली. रोटेशननुसार हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

तालुक्यातील ६४ पैकी ३३ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात अनुसूचित जातीसाठी  ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील ३ महिलांसाठी, नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती असून त्यातील ९ महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील ४२ पैकी २१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी. एल.सभागृह मंगळवारी  रितेश पाटील व भार्गवी केळुसकर या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार गंगाराम कोकरे,संभाजी खाडये,सत्यवान माळवे,राणे, मंडळ अधिकारी नागावकर आदी यावेळी उपस्थित होते. सनियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)आरती देसाई यांनी सोडत सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. 

आरक्षण पुढील प्रमाणे 

अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यापैकी अनुसुचित जाती महिलांसाठी नवीन कुर्ली, पिसेकामते, वाघेरी तर अनुसुचित जाती प्रवर्गासाठी शिरवल व  दारिस्ते ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे.या ग्रामपंचायती आरक्षित करताना गावातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ९ जागा आहेत. त्यामध्ये कलमठ, ओझरम, लोरे नंबर १, वागदे, खारेपाटण,  हरकुळ बुद्रुक, तरंदळे, साकेडी,चिंचवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या असून नडगीवे, ओटव, ओसरगाव, कासार्डे, वरवडे, फोंडाघाट, बोर्डवे,आयनल यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यात सर्वसाधारण महिलांसाठी  २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये असलदे, कळसुली, कसवण - तळवडे, कुरंगवणे -बेर्ले, कोंडये, कोळोशी, डामरे, तळेरे, तीवरे, नांदगाव, पियाळी, हरकुळ खुर्द, भरणी, नाटळ, जानवली, शिडवणे, नरडवे, आशिये, बेळणे खुर्द, घोणसरी, साळीस्ते या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये करंजे, करूळ, कासरल, कुंभवडे, गांधीनगर, तोंडवली -बावशी, दारोम, दिगवळे, नागवे, बिडवाडी, भिरवंडे, माईण, वायंगणी, वारगाव, शेर्पे, शिवडाव, सांगवे, सातरल, हळवल ,हुंबरठ, सावडाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचreservationआरक्षण