विद्यार्थ्यांसाठी कलेची दालने खुली करणाऱ्या कलाशिक्षकांचा कलाशिक्षक हा दर्जा काढून घेऊन मागील सरकारने शिक्षणाचा विनोद केला. त्या सरकारने केलेले पाप ठाकरे सरकार दूर करेल. कलाशिक्षकांना विशेष दर्जा देण्याबाबत शिवसेना आमदार विधिमंडळात आवाज उठवतील, असे प ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून महिलावर्गात मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मानसिक बदल घडवून आणण्याकरिता उत्कर्ष प्लस हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याची मा ...
कणकवली शहरातील पीटर इंग्लंड या कपड्यांच्या शोरुममधील चोरीतील पाच संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी तेथील एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्या पाचही संशयितांना कणकवली पोलिसांच्या पथकाने राजापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय परिसरातील वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकारी वर्गासाठीच्या इमारत वसाहतीला गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने या इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्याने मनुष्यहानी टळली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे. ...
जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी कोयती डोक्यात मारीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुसबे मधलीवाडी येथील सात आरोपींना जिल्हा वर्ग १ व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दोषी ठरविले आहे. यात आरोपींची शिक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुनावली जाणार आहे. ...
प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील तलावात अतिक्रमण करण्यात आले आहे. पंप लावून तलावातील पाणी उपसा करण्यात आला असून मातीची भर टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे तलावातील ९७ वनस्पती, २० वनौषधी आणि ५२ पक्षी यांचे ...