शुटींग बॉल स्पर्धेत  बीपीटी मुंबई अ संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:53 PM2020-02-06T14:53:38+5:302020-02-06T14:57:45+5:30

देवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या शुटींग बॉल स्पर्धेत बीपीटी मुंबई अ संघाने विजेतेपद पटकाविले.

BPT Mumbai A team wins championship in Shooting Ball | शुटींग बॉल स्पर्धेत  बीपीटी मुंबई अ संघाला विजेतेपद

शुटींग बॉल स्पर्धेत  बीपीटी मुंबई अ संघाला विजेतेपद

Next
ठळक मुद्देशुटींग बॉल स्पर्धेत  बीपीटी मुंबई अ संघाला विजेतेपददेवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने स्पर्धा

देवगड : देवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या शुटींग बॉल स्पर्धेत बीपीटी मुंबई अ संघाने विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या हस्ते झाले. विजेत्या बीपीटी मुंबई अ संघाला ५००० रुपये व चषक, उपविजेत्या मुंबई संघाला ४००० रुपये व चषक तर सेमी व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेता महादेश्वर संघाला ३००० रुपये व चषक, उपविजेत्या नारिंग्रे संघाला २००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला. मिठमुंबरी ते देवगड हायस्कूलपर्यंत घेण्यात आलेल्या खुल्या व शालेय फास्ट सायकल स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या हस्ते झाले.

  • खुला गट -प्रथम -सोहम गोकुळदास हरम, द्वितीय संजय प्रकाश भुजबळ, उत्तेजनार्थ गणेश महेंद्र ठुकरूल, ओम संदीप कुळकर्णी.
  • शालेय गट -प्रथम सुमुख जगदीश गोगटे, द्वितीय सागर शिवाजी कोळेकर, उत्तेजनार्थ सर्वेश सकपाळ व खुशाल प्रविण कदम.
     
  • वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देवगड हायस्कूलचे पर्यवेक्षक माने यांच्या हस्ते झाले. यामध्ये महिला गट १०० मीटर धावणे प्रथम अमिषा विठोबा गोलतकर, द्वितीय आयशा अब्दुल रऊफखान, तृतीय अक्षता उमेश खवळे. २०० मीटर धावणे प्रथम प्रिती अजित पुजारे, द्वितीय आयशा अब्दुल रऊफखान, तृतीय अक्षता उमेश खवळे. ४०० मीटर धावणे प्रथम दुशांती दत्ताराम देवळेकर, द्वितीय सानिका प्रदीप आंबेरकर, तृतीय प्रिती अजित पुजारे यांनी यश मिळविले.
  • लांबउडीत प्रथम अमिषा विठोबा गोलतकर, द्वितीय अक्षता उमेश खवळे, तृतीय धनश्री शिवानंद चव्हाण तर गोळाफेकमध्ये प्रथम दिशा अनिल मुळम, द्वितीय धनश्री शिवानंद चव्हाण, तृतीय आदिती राजेश कदम यांनी यश मिळविले.
  • पुरूष गट १०० मीटर धावणे प्रकारात प्रथम शिवराज प्रकाश खानविलकर, द्वितीय अक्षय अंकुश अनभवणे तर तृतीय क्रमांक नितीश अजित चौकेकर यांनी यश मिळविले.
  • २०० मीटर धावणे प्रथम अक्षय अंकुश अनभवणे, द्वितीय प्रणय लवू अनभवणे, तृतीय नितीश अजित चौकेकर.
  • ८०० मीटर धावणे प्रकारात प्रथम प्रसाद दिनकर नरसाळे, द्वितीय जितेश जनार्दन कोयंडे, तृतीय रोहित रवींद्र ठुकरूल यांनी यश मिळविले.
  • लांबउडीत प्रथम प्रणय लवू अनभवणे, द्वितीय अक्षय अंकुश अनभवणे, तृतीय अजय अनिरूध्द अभ्यंकर यांनी तर उंचउडीत प्रथम अजय अनिरूध्द अभ्यंकर, द्वितीय दीपराज दामोदर मेस्त्री व उत्तेजनार्थ संदेश राजेंद्र कदम, विराज दशरथ मुळम यांनी यश मिळविले.
  • गोळाफेक प्रथम दीपराज दामोदर मेस्त्री, द्वितीय अक्षय अंकुश अनभवणे, तृतीय साहील सत्यवान मेस्त्री
  • रस्सीखेच स्पर्धेत महिला गट प्रथम जय कुणकेश्वर (अ), द्वितीय जय कुणकेश्वर (ब) तर तृतीय देवगड हायस्कूल व पुरूष गटात प्रथम उमा मिलिंद पवार इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय देवगड हायस्कूल (अ), तृतीय देवगड हायस्कूल (ब) यांनी यश मिळविले.
     

बक्षिस वितरण कार्यक्रमाला मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन शिनगारे, खजिनदार हनिफ मेमन, अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, सेक्रेटरी शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप, भाई सावंत, श्रीकृष्ण मेस्त्री, द.ना.चव्हाण, रामदास जगताप, उमेश बिडये, राजू जगताप आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सुरेंद्र लांबोरे यांनी केले. सूत्रसंचालन शरद लाड यांनी केले तर आभार विलास रूमडे यांनी मानले. सर्व बक्षिसे पारकर फिशरीज, डॉ. योगेश भिडे, सुनील कुळकर्णी, ओमटेक असोशिएट्स, द्विजकांत कोयंडे, सतीश सकपाळ यांनी पुरस्कृत केली होती.

विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव

शुटींग व्हॉलिबॉल स्पर्धेतील नारिंग्रे संघ, वाडेगती बांदेवाडी, फटोबा पडवणे, वेंगुर्ला मातोंड या चार संघांना प्रत्येकी एक हजार तर एम्.बी.पी.टी संघ (ब), गांगेश्वर तळेरे या संघांना प्रत्येकी पाचशे रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले. वैयक्तिक क्रीडा व व्हॉलिबॉल स्पर्धा देवगड हायस्कूलच्या क्रीडांगणावर खेळविण्यात आल्या.

Web Title: BPT Mumbai A team wins championship in Shooting Ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.