कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
कुडाळ : कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यातून परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोकण ... ...
आम्ही चिरेखाणीवर रोजंदारीवर काम करतो.. धान्यसाठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही... एकतर आम्हांला धान्य द्या, नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्याह्ण अशी कैफियत असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलीस निरीक्षक ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रांमध्ये दुचाकीने फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम कर्मचारी, जीवनावश्यक ...
इचलकरंजी येथे गेलेले एक कुटुंब जानवली येथील नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला आले. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नातेवाईक रहात असलेल्या घराच्या मालकासह ग्रामस्थांनी त्यांना मुक्काम करण्यास विरोध केला. ...
मसुरे टोकळवाडी येथील प्रीती प्रमोद खोत यांच्या घराला लागलेल्या आगीत फ्रीज, फॅन, संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घरातील लाकडी छप्पराला ही लाग लागली. ...
बांदा पोलीसांनी सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे सापळा रचुन गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७४ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...