वेंगुर्ला काँग्रेसचे काम उत्कृष्ट : बी. एम. संदीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:42 IST2019-11-23T16:39:30+5:302019-11-23T16:42:40+5:30

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोकण प्रभारी बी. एम. संदीप यांनी  सिंधुदुर्ग दौ-यात तालुका काँग्रेस कार्यालयास भेट दिली आणि पक्षाच्या कामाची माहिती घेतली.

Excellent work of the Vangurla Congress | वेंगुर्ला काँग्रेसचे काम उत्कृष्ट : बी. एम. संदीप

वेंगुर्ला काँग्रेसचे काम उत्कृष्ट : बी. एम. संदीप

ठळक मुद्देजिल्हा दौ-यावेळी तालुका कार्यालयाला भेट

वेंगुर्ला : जिल्ह्यात वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे काम उत्कृष्ट असूून आगामी काळात वेंगुर्ला तालुका काँग्रेस कमिटी जिल्ह्यात एक नंबरवरच रहावी या दृष्टीने सर्वांनी कार्यरत रहा, अशा सूचना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोकण प्रभारी बी. एम. संदीप यांनी दिल्या.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोकण प्रभारी बी. एम. संदीप यांनी  सिंधुदुर्ग दौºयात तालुका काँग्रेस कार्यालयास भेट दिली आणि पक्षाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष दादा परब आणि जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक विलास गावडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बी. एम. संदीप यांनी तालुक्यातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्रांतिक सदस्य इर्शाद शेख, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, नगरसेवक आत्माराम सोकटे, पंचायत समिती सदस्या साक्षी कुबल, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, माजी पंचायत समिती सदस्य चित्रा कनयाळकर, आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Excellent work of the Vangurla Congress