शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

वैभववाडीत अज्ञात चोरट्याने भरदुपारी मारला मोबाईलवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:22 AM

वैभववाडी शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील माईणकरवाडी येथे घरात झोपलेल्या विद्यार्थिनींच्या मोबाईलवर अज्ञात चोरट्याने भरदुपारी डल्ला मारला.

ठळक मुद्देवैभववाडीत अज्ञात चोरट्याने भरदुपारी मारला मोबाईलवर डल्ला घटनेनंतर पोलिसांनी लावला शहरात होमगार्ड्सचा पहारा

वैभववाडी : शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील माईणकरवाडी येथे घरात झोपलेल्या विद्यार्थिनींच्या मोबाईलवर अज्ञात चोरट्याने भरदुपारी डल्ला मारला. मागील दरवाजाने घरात घुसलेला चोरटा दोन खोल्यांमध्ये फेरफटका मारून तिसरा मोबाईल उचलत असताना विद्यार्थिनींना जाग आली. त्यामुळे तो तिथेच टाकून दोन मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वैभववाडी माईणकरवाडी येथील अवधूत माईणकर यांच्या रस्त्यालगतच्या घरात विद्यार्थिनी भाड्याने राहतात. रविवार असल्याने दोन्ही खोल्यांचे पुढचे दरवाजे बंद करुन त्या आपापल्या खोलीत झोपल्या होत्या. दुपारी २.४५ च्या सुमारास चोरटा मागील दरवाजाने घरात घुसला. एका खोलीतून फिरून दुसऱ्या खोलीतील मोबाईल उचलत असताना विद्यार्थिनींना जाग आली त्यामुळे तो मोबाईल तेथेच टाकून चोरटा पसार झाला.दरम्यान, खिडकीवर ठेवलेले दोन मोबाईल त्याने लंपास केले. चोरटा पायातील स्लीपर तेथेच टाकून गेला. चोरट्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट होता. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली.

पोलीस हवालदार राजू जामसंडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरटा पळालेल्या दिशेने पोलीस गेले असता सुकनदीत आंघोळ करणाऱ्या मुलांनी अनोळखी व्यक्ती नदीतून उतरून पलीकडे एडगावच हद्दीत गेल्याचे पोलिसांना सांगितले.भरवस्तीत रहदारीच्या मार्गालगत दुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात होमगार्ड्सचा पहारा लावला आहे. या घटनेमुळे शहरातील अंतर्गत मार्गावरही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद झालेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग